रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडे या आर्थिक वर्षासाठी नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. मात्र, पुढचं पाठ मागचं सपाट, या उक्तीनुसार गेल्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा मात्र विसर पडला आहे. शासनाच्या या उफराट्या न्यायामुळे जनावरांचे नुकसान झालेले शेतकरी तसेच खासगी मालमत्ताधारक नुकसानग्रस्त यांना अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या वर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने ८९० घरे व गोठ्यांचे एकूण १००,२४,४८६ रूपयांचे नुकसान केले आहे. ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगीमालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण १ कोटी २१ लाख ३१ हजार ५४७ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंदप्रशासनाकडे असली तरीही त्याहीपेक्षा जास्त नुकसान जिल्ह्यात झाले आहे. या नुकसानाची भरपाई आतापर्यंत केवळ २९ लाख रूपये इतकेच शासनाकडून देण्या आले आहेत. तसेच या कालावधीत पावसाने बळी घेतलेल्या पाच व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे साडेसात लाख रूपये देण्यात आले आहेत. यात केवळ ८१ घरे व गोठ्यांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे. उर्वरित शेतकरी व खासगी मालमत्ताधारकांना अद्याप भरपाईही मिळालेली नाही. यावर्षीसाठी नव्याने निधी आला. मात्र, मागच्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा विसर शासनाला पडलेला दिसतो. जिल्ह्यात या पावसाळ्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या वारसांना ८ लाख रूपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात पडझड झालेली घरे व गोठ्यांसाठी १० लाख रूपये देण्यात आले आहेत. यावर्षी मृत जनावरांच्या मालकांना अडीच लाखाचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत २० लाख ५० हजार रूपयांचे वितरण झाले आहे. यावर्षी सुरूवातीला झालेल्या पावसात बळी गेलेल्यांच्या वारसांना, मृत जनावरांच्या मालकांना तसेच पडझड झालेली घरे, गोठ्यांसाठी शासनाकडून निधी आला आहे. मात्र, गतवर्षीच्या नुकसानाबाबत शासन बेदखल आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचे बियाणेकोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत आहेत. पुढचं पाठ मागचं सपाट या न्यायाने गत नुकसानग्रस्तांची भरपाई लाल फितीत अडकली आहे. शेतीचे, शेतजनावरांचेही नुकसान सोसावे लागल्यामुळे मागील नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.तपशीलसंख्यानुकसानाची रक्कमप्रत्यक्ष मिळालेलीघरे व गोठे८९० १००,२४,४८६२९,००,००० (८१ घरे व गोठ्यांसाठी)व्यक्ती०५७,५०,०००७,५०,०००जनावरे०८१,९४,५००अद्याप नाही सार्वजनिक३१५,२१,४००अद्याप नाही खासगी ४७६,४१,१६१अद्याप नाही
आधीची भरपाई गारठली
By admin | Published: June 30, 2015 11:36 PM