सिंधुदुर्गात तयारी पूर्ण, हरिनामाने शेवटची रात्र रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:01 PM2018-09-22T17:01:40+5:302018-09-22T17:04:12+5:30
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणेश मूतिंर्पैकी काहीचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे अकरा दिवसांच्या गणेशोत्सवातील शेवटची रात्र शनिवारी रंगणार आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणेश मूतिंर्पैकी काहीचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे अकरा दिवसांच्या गणेशोत्सवातील शेवटची रात्र शनिवारी रंगणार आहे. या रात्री भजनी मंडळे आपली कला श्रींच्या चरणी अर्पण करणार आहेत. त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरु आहे.
कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला 13 सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. गेले दहा दिवस श्री गणरायाची मनोभावे पूजा, आरती, भजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी दीड, पाच ,सात, नऊ दिवसांनी श्री गणेश मूतिंर्चे विसर्जन करण्यात आले. रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या प्रमाणात श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन केले जाईल.
त्यासाठी नदीवरील गणपती साण्यावर साफसफाई केली जात आहे. तसेच त्याठिकाणी सुशोभिकरणही करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनंत चतुर्दशी दिवशी ज्या घरातील श्री गणेश मूतिंर्चे विसर्जन करण्यात येणार आहे त्याघरात शनिवारी गणेशोत्सवातील शेवटची रात्र साजरी करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.
शनिवारी रात्री या घरात गावातील तसेच इतर परिसरातील भजन मंडळे आपली कला सादर करणार आहेत. त्यांच्या चहापाणाची व्यवस्था करण्यासाठी तयारी केली जात आहे. तर उसळ पाव, वडापाव असा खास बेतहि करण्याचे नियोजन काही घरात करण्यात आला आहे.
वातावरण भारावलेले, आज शेवटची रात्र
शनिवारची रात्र गणरायाच्या नामस्मरणाने रंगणार आहे. आपला लाडका गणपती बाप्पा परत आपल्या घरी जाणार ही कल्पनाच अनेक भाविकाना नकोशी वाटत आहे. त्यामुळे त्यांचे अंत:करण भरून येत आहे.
गणरायाने आपल्या भेटीला पुढच्या वर्षी लवकर यावे, अशी विनवणी त्याला करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील संपूर्ण वातावरणच जणू भारावल्या सारखे झाले आहे.
बाळ गोपाळांकडून नियोजन
कणकवली टेंबवाडी येथील मानाच्या संतांच्या गणपतीलाही रविवारी निरोप दिला जाणार आहे. त्याबाबत बाळ गोपाळांकडून नियोजन सुरु आहे. शनिवारी रात्री या ठिकाणीही प्रतिवर्षाप्रमाणे आरती तसेच भजनांचा कार्यक्रम होणार आहे. तर उपस्थित भाविकाना करंजी व ह्यसबजीह्ण असा प्रसाद दिला जाणार आहे.