ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत ८३ टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि संचालकांचा सर्वच बँक सभासदांनी गौरव केला. अभिनंदनाचा ठराव घेत बँकेच्या अत्याधुनिक कामकाज आणि पारदर्शकतेबाबत जाणकार सभासदांनी आपली मते मांडली.सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे संचालक विरुद्ध भाजप संचालक असे शाब्दिक युद्ध रंगेल म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा भरगच्च सभासदांच्या उपस्थितीत झाली.कोरोनाचे सर्व नियम पाळून सकाळी ११ वाजल्यापासून सभासदांना मताचा अधिकार आणि सभागृहातील प्रवेशाबाबत ठराव एकत्रित करीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. शरद कृषी भवन येथे दुपारी १२ वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अनेक विषयांवरून जिल्हा बँकेचे कौतुक करण्यात आले.सभागृहामध्ये अहवालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर सभा कामकाजाला सुरुवात झाली. माजी चेअरमन तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार आणि बँकेचे माजी संचालक अॅड. अजित गोगटे यांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी व्यासपीठावर बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक विकास गावडे, अतुल काळसेकर, व्हिक्टर डान्टस, प्रमोद धुरी, गुरुनाथ पेडणेकर, नीता राणे, प्रज्ञा परब, अविनाश माणगांवकर, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, आर. टी. मर्गज, विद्याधर बांदेकर, नितीन वाळके, गुलाबराव चव्हाण, राजन गावडे, शरद सावंत, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, जिल्हा दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम. के. गावडे, प्रसाद रेगे, पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. प्रसाद देवधर यांच्यासह सभासद संस्थांचे पदाधिकारी, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नितीन वाळके यांनी अहवाल वाचनात मांडल्या विविध सूचनाबँकेने कर्जवसुलीबाबत चांगला निर्णय घेतला आहे. वसुलीही चांगली असल्याने नाबार्डच्या ह्यऑडिट अ वर्गह्णमध्ये या बँकेचा सातत्याने असलेला समावेश हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील लोकांना आर्थिक मदत करीत असताना शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी केलेल्या विविध योजना, पशुउत्पादनांसाठी बँकेने सुरू केलेल्या योजना कौतुकास्पद असल्याचे मत सर्व सभासदांकडून मांडण्यात आले.मालवणचे नितीन वाळके यांनी अहवाल वाचनात आपल्या विविध प्रकारच्या सूचना केल्या. त्याची दखल संपूर्ण सभागृहाने घेतली. तसेच सहकारातील जाणकार वारंग, एम. के. गावडे आदींनी यावेळी मत व्यक्त केले.
अध्यक्ष, संचालकांचा गौरव :जिल्हा बँकेने आदर्श निर्माण केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 5:20 PM
BankingSector Sindhudrug- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत ८३ टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि संचालकांचा सर्वच बँक सभासदांनी गौरव केला.
ठळक मुद्दे अध्यक्ष, संचालकांचा गौरव :जिल्हा बँकेने आदर्श निर्माण केला वार्षिक सभेत जाणकार सभासदांनी मांडली मते