शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

एकीच्या बळातून गावाला पुरस्काराचे फळ

By admin | Published: September 03, 2015 11:22 PM

दापोलीतील शिवाजीनगर : संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत राज्यस्तरावर दुसरा क्रमांक

शिवाजी गोरे -दापोली  -जंगल तोडीमुळे ढासळलेले पर्यावरण संतुलन, जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीवरील आक्रमण व जंगली प्राणी नामशेष होण्याचे प्रकार केवळ जंगल तोडीमुळे होत आहेत. जंगल तोडीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने गावागावात वन व्यवस्थापन समित्या स्थापन करुन वनव्यवस्थापन व वनांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. दापोली तालुक्यातील शिवाजीनगर या गावाने यामध्ये यश मिळवले आहे. लोकसहभागातून वनसंवर्धन व वन्यजीव रक्षण करुन उत्कृष्ट कामातून संत तुकाराम वनग्राम पुरस्कारापर्यंत मजल मारल्याने शिवाजीनगर गावाला एकीचे फळ मिळाले आहे. शिवाजीनगर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून गावाच्या महसूली हद्दीतील जंगलाची संरक्षण मोहीम हाती घेतली आहे. दापोली शहरापासून जवळच असणाऱ्या या गावाला वाढत्या शहरीकरणाचा फटका बसू नये, नैसर्गिक जंगल नष्ट होऊन गावात सिमेंटचे जंगल निर्माण होऊ नये, यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने जमीन विकण्यावर बंदी ठराव करुन घेतला आहे. गावात चरई बंदी, कुऱ्हाडबंदी, शिकार बंदीचा ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर करुन त्याचे पालनही काटेकोरपणे केले जात आहे. शिवाजीनगर संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे ८६.५५ हेक्टर वनक्षेत्र आहे. २०१३-२०१४मध्ये नैसर्गिक पुन:निर्मिती अंतर्गत २५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन उभारण्यात आले आहे. केवळ रोप उभारून ही समिती एवढ्यावर थांबली नाही, तर रोपवन जगवण्याची जबाबदारीही स्वीकारली. त्यातून २५ टक्के रोपवन जगवून वृक्ष संवर्धनाच्या मार्गावर वाटचाल सुरु ठेवली आहे. पावसाच्या पाण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पना राबवून मृद आणि जलसंधारणाची कामे ग्रामस्थ लोकसहभागातून करीत आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरीही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पडणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. परंतु, या गावाने पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन केले आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून मृद आणि जलसंधारणाची कामे केली आहेत. जंगलातून वाहणारे ओहोळ, नाले यावर दगड - मातीचे बांध घातले आहेत. त्यामुळे पाणीसाठा होेऊन मातीची धूप थांबली आहे. पावसाचे पाणी डोंगराळ व अतिउतार भागातील वाहून जाऊ नये, यासाठी दगडी बांध व चर मारुन जमिनीत पाणी जिरविण्याचे काम करण्यात आले आहे.गावातील लोकांना वनांचे महत्व कळावे, त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, म्हणून संयुक्त वनव्यवस्थापन समिती गावातील ग्रामसभेत वृक्ष लागवडीचे महत्व, वनांचे व वन्यजीव प्राण्याचे मानवी जीवनात असलेले महत्व पटवून देऊन प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण, पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीचे धडे देऊन शाळेतील भिंतीवर सुविचार लिहायला लावले जात आहे. शाळेतील वर्गखोल्यातील भिंतीवर अनेक प्रकारचे वृक्ष संवर्धन, पर्यावरणाचे चित्र रंगवून संदेश दिला जात आहे. पर्यावरण वाचवा, वाद्य वाचवा, जंगल तोड करु नका असे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देऊन शाळेतील शिक्षकांनी गावातून प्रभातफेरी काढली. या माध्यमातून वन संवर्धनाचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आला. लोकसहभागातून गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वृक्ष लागवड, सांडपाण्याचे नियोजन तसेच पावसाचे पडणारे पाणी अडवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गावातील व शिवारातील विहिरी लोखंडी जाळीने बंदिस्त करण्यात आल्या आहेत. बंदिस्त विहिरींमुळे वन्य प्राण्यांच्या जीवाचा धोका नष्ट झाला आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणूनच या गावाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला आहे.शिवाजीनगर गावाने लोकसहभागातून वनसंवर्धन शक्य करुन दाखविले आहे. वनांचे संवर्धन व जतन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीने यासाठी पुढाकार घेतला तर वन व्यवस्थापनाचे अनेक फायदे असू शकतात, याचा प्रत्यय शिवाजीनगर गावाला आला आहे. गावातील रोपवाटिका, वृक्ष लागवड, वन्य प्राण्यांचे रक्षण, वृक्षतोड बंदी करुन या गावाने श्रमदानातून वन्यजीव प्राण्यांसाठी पाणवटे निर्माण करुन जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न खूप वाखाणण्याजोगे आहेत. आमच्या गावाने लोकसहभागातून केलेल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. - संजय महाडिक, अध्यक्ष -वन व्यवस्थापन समिती, शिवाजीनगर वनांचे जतन आणि वनसंवर्धन धोरण शासनाने ठरवून दिले आहे. वर्षागणिक उष्णतेचे तीव्र चटके बसत असल्याने वनक्षेत्र असलेल्या प्रत्येक गावात वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनसंवर्धन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. दापोलीच्या शिवाजीनगर गावाने लोकसहभागातून केलेली कामे उत्कृष्ट आहेत. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर या गावाला २०१३-१४चा संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत राज्यातील दुसरे बक्षीस जाहीर झाले आहे. शासनाचे हे बक्षीस संपूर्ण गावाने एकीच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाचे फळ आहे. केवळ लोकसहभागामुळे हे शक्य झाले आहे. - राजेंद्र पत्की, वनपरिक्षेत्र अधिकारी, दापोली मोफत गॅस वाटप कलम रोपांचे वाटप करण्यात आले. वन विभागाच्या योजना या गावात राबवण्यात आल्या आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या कामात सतत सुधारणा व्हावी, समित्यामध्ये चुरस निर्माण होऊन त्यातून शाश्वत वन व्यवस्थापनावर आधारित वनसंरक्षण आणि वनसंगोपनाद्वारे गावाचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संत तुकाराम वनग्राम योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी गावांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते. सन २०१३-१४ या वर्षीचा राज्यस्तरीय दुसरा क्रमांक पटकावून शिवाजीनगर गावाने पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. गावाने राबवली वणवामुक्ती मोहीमकोकणातील जंगलांना वणव्याचा मोठा शाप आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वणव्यांमुळे जंगली वृक्ष, वन्यजीव प्राणी, निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असणारे किडे, मुंग्या, साप, सरपटणारे प्राणी असे अनेक महत्वपूर्ण घटक जळून खाक होतात. परंतु, गावाने आगीच्या वणव्यातून रक्षणासाठी जाळरेषेचे काम केले आहे. गावातील जंगलावर नजर ठेवण्यासाठी वनरक्षकाच्या माध्यमातून २४ तास पहारा देणारे काम सुरू आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड, वनजमिनीवरील अतिक्रमण, अवैध चराईस प्रतिबंध करण्यात आला आहे, त्यामुळे जंगलांचे आगीपासून रक्षण करण्यास मदत होत आहे. वन व्यवस्थापन समितीप्रमाणेच गावाच्या वनांच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थाची असल्याचे मानून काम केले जाते. घर तेथे हिरवाईची संकल्पनाजंगलातील वृक्ष संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. गावाच्या हद्दीत असणारे पारंपरिक वड, पिंपळ, किंजळ, ऐन, खैर, साग या वृक्षांचे संवर्धन केले जाते आहे. वन जंगलातील औषधी वनस्पधींचे संवर्धन करून लागवड केली जात आहे. केवळ वन जंगलाचे संवर्धन व वृक्षारोपण करुन ग्रामस्थ स्वस्थ बसले नाहीत, तर कुटुंबातील ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना मांडण्यात आली आणि गावातील लोकांच्या सहकार्यायातून ती कल्पना सत्यात उतरवण्यात आली आहे. त्यामुळे घराशेजारील मोकळ्या जागेत नारळ, सुपारी, आंबा, काजू, चिकू, साखळी ही उत्पन्न देणारी वृक्षांची लागवड केली आहे. वृक्ष लागवडीमुळे हिरवेगार शिवाजीनगर गाव बनले आहे. वनांमुळे पर्यटन विकासाची संधीशिवाजीनगर गावातील संरक्षित वनामुळे पर्यटनाला चांगली संधी निर्माण झाली आहे. शिवाजीनगर व बांधतिवरे मौजे दापोली या गावांच्या सीमेलगत वन विभागाचे संरक्षित जंगल आहे. या जंगलातून बारमाही वाहणारी बांधतिवरे नदी यामुळे या पंचक्रोशीतील जंगलामध्ये वनभोजन, ट्रेकिंग, जंगल सफर, नदीत पोहणे पर्यटकांची पर्यटन सफर, निसर्ग पर्यटनालासुध्दा वेगळे महत्व असल्याने अनेक पर्यटक शिवाजीनगरच्या निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. या गावाने जपलेल्या निसर्गसौंदर्यामुळे भविष्यात या गावातील निसर्ग पर्यटनाला चांगली संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन ग्रामस्थांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे. पशु-पक्षी, प्राण्यांसाठी पाणवठेवन व्यवस्थापन समिती वनांच्या संवर्धनाबरोबरच वन्यजीव प्राण्यांचे रक्षणही करीत आहे. पंचक्रोशीतील शिकार बंदीमुळे वन्य प्राणी सुरक्षित झाले आहेत. पण उन्हाळ्यातील पाण्याअभावी अनेक पशु पक्षी मरतात. पाण्याच्या ठिकाणी मानवाने वस्ती केल्यामुळे प्राण्यांचे हाल होत आहेत. म्हणून समितीच्या माध्यमातून वन्य प्राण्यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. या पाणवठ्यावर बिबट्या, भेकर, रानडुक्कर, ससे, माकड, कोल्हे, नीलगायींचा संचार मोठ्या प्रामाणावर आढळतात. प्राण्यांप्रमाणेच पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या वृक्षाखाली पाणवठे तयार करुन पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पक्ष्यांचा किलबिलाट सुरु असतो.