कणकवली : माजी मुख्यमंत्री , भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी नागरिकांंच्या विविध समस्या जाणून घेतल्या . शेतकरी , व्यावसायिक , व्यक्तिगत प्रश्न असणाऱ्या जनतेची गा-हाणी ऐकून घेतली. काही प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार करण्याचे तर प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी या भेटी दरम्यान उपस्थितांना दिले .कणकवली येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित जनसंवाद कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मागण्या व विविध रखडलेल्या विकास कामा संदर्भात निवेदने नारायण राणे यांच्याकडे दिली.सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे पाढे अनेकांनी यावेळी वाचले.या जनसंवाद कार्यक्रमच्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत , भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे , जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाळा जठार , महेश गुरव , संदीप मेस्त्री , मिलिंद मेस्त्री , स्वप्निल चिंदरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध विषय घेऊन नागरिक ही उपस्थित होते .
नारायण राणे यांनी अनेक विषयासंदर्भात थेट आश्वासने नागरिकांना यावेळी दिली. त्याच बरोबर विकास कामांचा पाठपुरावाही करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. समस्यांबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून त्यांना न्याय देणार असल्याचे कार्यक्रमाच्या शेवटी नारायण राणे यांनी सांगितले.