सिंधुदुर्गनगरी : सन २०१४-१५ या वर्षात आंब्याची परदेशात निर्यात करता यावी यासाठी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सुरु आहे. याबाबत जिल्ह्यातील २२ आंबा उत्पादक संस्थांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.मँगोनेट संगणक प्रणालीद्वारे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची नाव नोंदणी सुरु आहे. जिल्ह्यातील २७ हजार ८६० हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली आहे. बहुतांश क्षेत्र हे हापूस आंबा पिकाखाली आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच युरोप व अन्य देशात निर्यात केली जाते. सन २०१३-१४ या वर्षात आंबा निर्यात वाढीमुळे आंबा बागायतदारांना परदेशात आंबा पाठविता आला नाही. त्यामुळे चालू वर्षी आंबा निर्यात करता यावा या उद्देशाने आंबा उत्पादकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.फलोत्पादन संचालकांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या दोन महिन्यात मँगोनेट संगणक प्रणाली अंतिम होणार असून त्याची पूर्वतयारी सुरु आहे. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी नावनोंदणी करावयाची असून परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी नावनोंदणी करावयाची असून नोंदणीसाठी अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी व आंबा उत्पादक संस्था यांच्याकडे उपलब्ध आहेत. सहकारी संस्थांनी नावनोंदणी करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
माहिती गोळा करण्याची कार्यवाही
By admin | Published: July 10, 2014 12:13 AM