बांदा : ओटवणे दशक्रोशीतील महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीवर अत्याचार करण्यात आलेल्या नराधमांना जास्तीत जास्त कडक शासन करावे जेणेकरुन अशा घटनांना पायबंद बसेल. आपल्या परिसरात अशा घटना निंदनीय असून, पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता या घटनेचा सखोल तपास करावा. युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर काही तासातच बांदा पोलिसांनी संशयित तिघा युवकांना ताब्यात घेतल्याने जिल्हा काँग्रेसच्यावतीने बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच संबंधित अत्याचारग्रस्त युवतीच्या कुटुंबाच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभे राहणार असून, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत अशी मागणी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केली.काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांची पोलिस ठाण्यात भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली. तसेच प्रदीप गीते यांना निवेदन दिले. आपल्या परिसरातील ग्रामीण भागात युवतींवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याने यामुळे समाजातील अपप्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी देखील तातडीने आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कलमे लावली याबद्दल अभिनंदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी युवती अत्याचार प्रकरणातील संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सांगितले.यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिमा पाताडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, माजी सभापती स्नेहलता चोरगे, कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, सभापती विभावरी खोत, रेश्मा राजगुरु, शहर अध्यक्ष जावेद खतीब, राजन कळंगुटकर, गुरुनाथ सावंत, स्वप्नील नाईक, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, महिला तालुुकाध्यक्ष गीता परब, साई धारगळकर, शहर उपाध्यक्ष बाळू सावंत, राखी कळंगुटकर, चित्रा भिसे, लक्ष्मी सावंत, गौरांग शेर्लेकर, रवी आमडोसकर, शेर्ले सरपंच उदय धुरी, उन्नती धुरी, श्याम सावंत, विनेश गवस, धीरज भिसे, मंदार धामापूरकर, सोनल धुरी, सत्यवान बांदेकर, दया धुरी, स्वप्नील सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलिस तपास : कडक शासन होण्यासाठी प्रयत्नतक्रार दाखल झाल्यानंतर काही वेळातच आपण संशयितांना एकाचवेळी ताब्यात घेतले. त्यांना जास्तीत जास्त कडक शासन होण्यासाठी आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचे सांगितले.
दबाव झुगारून सखोल तपास करावा
By admin | Published: July 25, 2016 10:36 PM