चिपळूण : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचे काही बरे वाईट झाले तर कोकण भस्मसात होईल. ऊर्जानिर्मिती ही कचऱ्यापासून समुद्राच्या लाटांपासून व लहान नद्यांमधूनही करता येते. त्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पच कशासाठी हवा? जैतापूरला १० हजार मेगावॅट औष्णिक ऊर्जा तयार होईल. पैकी किती ऊर्जा कोकणासाठी वापरली जाईल, याचा विचार करा आणि जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. दाभोळ खाडीतील कालुस्ते हद्दीत असलेल्या आयलँड पार्क या बेटावर रविवारी सकाळी ग्लोबल टुरिझम मल्टिपर्पज सोसायटीतर्फे आयोजित बॅकवॉटर फेस्टिवल व क्रोकोडाईल सफारीचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाला. गोवळकोट धक्क्यावरून मान्यवरांसह पर्यटकांना बोटीने बेटावर नेण्यात आले. तेथे झांजपथकाच्या सहाय्याने स्वागत करण्यात आले. पालकमंत्री वायकर यांनी औपचारिक उद्घाटन केले. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, तहसीलदार वृषाली पाटील, एमटीडीसीचे जगदीश चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार बापू खेडेकर, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक बर्वे, सरपंच अब्बास जबले, सरपंच सुहास बहुतुले, जानकी बेलोसे, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, गटनेते राजू देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, महिला बालकल्याण सभापती आदिती देशपांडे, बांधकाम सभापती शिल्पा सप्रे, उपसभापती शिल्पा खापरे, पाणी पुरवठा सभापती रुक्सार अलवी, माजी नगराध्यक्षा हेमलता बुरटे, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आर. सी. काळे ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, सचिव संजय अणेराव, सुनील साळवी, शाहनवाज शाह, महेंद्र कासेकर, अलिम परकार, सज्जाद काद्री, व्यवस्थापक विश्वास पाटील, प्रेरणा लाड, राजेश पाथरे, समीर कोवळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष रेडीज यांनी गेली दोन वर्षे सातत्याने ग्लोबल टुरिझमच्या माध्यमातून पर्यटनाच्या वाढीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्यानंतर नगराध्यक्षा सावित्री होमकळस, जानकी बेलोसे, सचिन कदम, माजी आमदार बापू खेडेकर, आमदार सदानंद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. खासदार हुसेन दलवाई यांनी पर्यावरणपूरक पर्यटन विकास होणे गरजेचे आहे. आपण रिवेरासाठी फ्रान्समध्ये व इतर ठिकाणी जातो. परंतु, कोकणात अनेक डोंगर आहेत, टेकड्या आहेत तेथे उत्तम रिवेरा होऊ शकतात, अशी शपथ दलवाई यांनी घेतली. (प्रतिनिधी)किल्ले विकासासाठी आराखडा तयारकिल्ल्यांच्या विकासासाठी व पर्यटनासाठी आपण ६७० कोटीचा आराखडा केला आहे. त्यामध्ये गोवळकोट किल्ल्याचा समावेश आहे. प्रत्येक किल्ल्याला १ कोटी रुपये देणार आहोत. परंतु, त्यासाठी स्थानिक पातळीवर एनओसी मिळविणे गरजेचे आहे. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत तरच विकास शक्य आहे असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केले. परशुराम ते गोवळकोट दरम्यान रोपवेसाठी कन्सल्टंट विवेक साल्येकर काम पाहात आहेत. लवकरच त्याचा प्रस्ताव आपल्याकडे येईल आणि त्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करु. चिपळूण शहरासाठी ६ सिमेंट रोडचा २९.७९ कोटीचा प्रस्ताव आपल्याकडे आला असल्याचे ते म्हणाले.
जैतापूरसारखा प्रकल्प परवडणार नाही : वायकर
By admin | Published: December 27, 2015 10:17 PM