शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

मद्यधुंद युवकांना चित्रीकरणाने प्रौत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 6:07 PM

महादेव भिसेसिंधुदुर्ग, दि. 3 : आंबोलीतील कावळेसाद पॉंंर्इंटवर दोघे युवक दरीत पडून मृत झाल्याची घटना घडल्यानंतर त्या मागचे सत्य चार दिवसांनी व्हिडिओ चित्रीकरणामुळे बाहेर आले. हे दोघेही युवक मद्यधुंद अवस्थेत दरीच्या वर असलेल्या रेलिंग वर मौजमजा करताना हा सर्व प्रकार घडल्याचे पुढे येत असले तरी आता व्हिडिओ काढणाºया युवकांनी या ...

महादेव भिसेसिंधुदुर्ग, दि. 3 : आंबोलीतील कावळेसाद पॉंंर्इंटवर दोघे युवक दरीत पडून मृत झाल्याची घटना घडल्यानंतर त्या मागचे सत्य चार दिवसांनी व्हिडिओ चित्रीकरणामुळे बाहेर आले. हे दोघेही युवक मद्यधुंद अवस्थेत दरीच्या वर असलेल्या रेलिंग वर मौजमजा करताना हा सर्व प्रकार घडल्याचे पुढे येत असले तरी आता व्हिडिओ काढणाºया युवकांनी या दोघांना प्रोत्साहित केले तर नसावे ना, असा संशय येत आहे. जर तेथील लोकांनी या दोघा युवकांना प्रोत्साहित करण्यापेक्षा त्यांना थोडे समजावले असते तर दोघांचेही प्राण वाचले असते असेच सर्वांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटत आहे. त्यामुळे आता व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचे सत्य काय? हेच शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्री काम करणारे सात युवक आंबोली कावळेसाद येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यातील काही युवक जेवणे करीत होते. तर इम्रान गार्दी व प्रशांत राठोड यांनी आपण फिरून येतो असे सांगून तेथून निघून गेले. यावेळी त्यांनी एका हातात दारूची बाटली आणि एका हाताने दरीच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर मौजमजा करता करता ते कावेळसादच्या खोल दरीत पडले. सुरूवातीला दरीत पडल्याबाबत सांशकता वाटत होती. अनेक जणांनी युवक पडल्याचे पाहूनही पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. काही काळ तर पोलीस खरोखरच युवक पडले का? यांची खात्री करीत होते. पण रात्री उशिरा यातील दोन युवक पडल्याचे पुढे आले.

गेले चार दिवस या बेपत्ता युवकांचा सांगेली, आंबोली व कोल्हापूर येथील शोधपथके शोध घेत आहेत. दाट धुके तसेच खाली मोठा पाण्याचा प्रवाह यामुळे मृतदेह पुढे पुढे वाहून जात असल्याने त्यांना दरीतून बाहेर काढताना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच हे युवक सोमवारी सायंकाळी दरीच्या बाजूच्या रेलिंगवर मौजमजा करतानाचा एक व्हिडिओ बुधवारी रात्री व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ त्या दिवशी कावळेसाद पॉर्इंट येथे आलेल्या कर्नाटकच्या गु्रपमधील कोणत्या तरी युवकाने चित्रीत केल्याचे पुढे आले आहे. गेले चार दिवस हा व्हिडिओ कर्नाटकमधील वेगवेगळ्या गु्रपवर फिरत होता त्यानंतर तो बुधवारी रात्री जिल्ह्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.दरीत मद्यधुंद अवस्थेत पडलेहे दोन युवक सेल्फीमुळे खोल दरीत पडल्याचे अनेकांनी शक्यता वर्तवली होती. पण ते सेल्फीमुळे नाही तर मद्यधुंद अवस्थेत दरीत पडल्याचे आता उघड झाले आहे. कारण या युवकांकडे असलेले मोबाईलही साधे होते. तसेच त्यांनी पूर्ण आपल्या दौºयात कुठेच फोटोसेशन केले नव्हते. त्यामुळे ते मौजमजा करण्यासाठीच आले होते, हे यामुळे पुढे आले आहे.व्हिडिओ कर्नाटक मधील युवकांनी काढलाहे दोन युवक ज्या वेळी दरीच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर मौजमजा करीत होते. त्यावेळी तेथे कर्नाटकच्याही काही युवकांचा गु्रप आला होता. या गु्रपने दोघाही युवकांना प्रोत्साहित केले. त्यात त्यांचा जीव गेल्याचे बोलले जात असून, घटनेनंतर व्हिडिओ काढणारे युवकांनी तेथून पोलीस यायच्या पूर्वी पोबार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर चार दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.जीव वाचवण्यापेक्षा चित्रीकरणाला महत्वदोन युवक दरीच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर मौजमजा करीत होते. ते आतमध्ये पडणार हे तेथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या सर्वांना माहित होते. असे असतानाही तेथील अन्य लोकांनी तसेच व्हिडिओ चित्रीकरण करणाºयांनी पडणाºया युवकांना वाचवण्यापेक्षा व्हिडिओ चित्रीकरण करणाºयास जास्त महत्व दिले. त्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागल्याचे दिसून येत आहे.व्हिडिओ काढणाºयाला शोधण्याचे पोलिसांना आव्हानदोन युवकांना प्रोत्साहित करून मृत्यूच्या दाढेत टाकणाºया त्या व्हिडिओ चित्रीकरण करणाºयांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांना असून, त्या युवकांना शोधल्यास यातून आणखी सत्य बाहेर येण्यास मदत होणार आहे.व्हिडिओची सत्यता पडताळून पाहणार : सुनील धनावडेआंबोली कावळेसाद येथे घडलेला प्रकार गंभीर आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेऊ असे सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले.साध्या मोबाईल मधून व्हिडिओ कसा येईल : श्रीधर मगदूमआम्ही गडहिंग्लज वरून पोल्ट्रीमध्ये काम करणारे सर्वजण फिरायला आलो होतो. आमच्याकडे अँड्रॉईड मोबाईलही नाही. साधे फोटोसेशनही कुठे केले नाही मग व्हहिडिओ कसा काढणार, असा सवाल या दोन मृत युवकांसोबत आलेल्या श्रीधर मगदूम यांनी केला आहे. हा व्हिडिओ कर्नाटकचा गु्रप त्यावेळी तेथे होता त्यांनी बनवला असावा, असा संशय मगदूम यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या मृत युवकांसोबतच्यांनी व्हिडिओ बनवला नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.