शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

कागदनिर्मिती उद्योग आणण्याचा प्रस्ताव

By admin | Published: August 15, 2016 12:13 AM

दीपक केसरकर : वेंगुर्ले प्रादेशिक फळसंशोधन केंद्राच्या सभागृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

वेंगुर्ले : मनरेगाअंतर्गत बांबू लागवडीला भरपूर वाव आहे. बांबूपासून फर्निचर, तंबू, शोभेच्या वस्तू आदी निर्मितीला चांगली मागणी आहे. बांबूपासून कागद तयार करण्याची इंडस्ट्रीज जिल्ह्यात येवू शकते. पण अशा इंडस्ट्रीजपासून पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची शहानिशा करुनच असा प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात जलयुक्त शिवार व मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांचे नियोजन व उपाययोजना आदींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, चांदा ते बांदा योजना अधिकारी लिना बनसोडे, उपजिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा योजनेंतर्गत मनरेगाच्या मदतीने गोपालन, डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जाणार आहे. त्यासाठी मनरेगा व चांदा ते बांदा या योजनेच्या निधीचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येणार आहे. यावेळी किनारपट्टी भागात नवाबाग-उभादांडा याठिकाणी पर्यटनासाठी तंबू उभारण्यात येणार असून एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यासाठीचे स्पॉट आयडेंटीफाय करण्याच्या सूचना केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक तालुक्यात मनरेगाअंतर्गत वृक्षलागवड करतांना फळ पिकांच्या व फूलशेतीच्या लागवडीवर जास्त भर दिल्यास ते फायदेशीर ठरेल. त्यासाठी अशा झाडांची निश्चित करुन जांभूळ, कोकम, पेरु, फणस आदी झाडांंचा यामध्ये समावेश करुन त्यांच्या लागवडीबाबतचे प्रस्ताव मनरेगा विभागामार्फतच पाठवा. त्यातून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. वेंगुर्ले येथील जिल्हा समाजकल्याणच्या वसतीगृहात तातडीने सोयीसुविधा पुरविण्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा, जिल्ह्यातील नगरपरिषद व ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीटलाईटबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करुन ३० आॅगस्टपर्यंत स्ट्रीटलाईटचा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)