शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

शांतता असेल तरच समृध्दी

By admin | Published: September 01, 2014 9:12 PM

के. सी. चौरे : दोडामार्ग येथे तंटामुक्त पुरस्काराचे वितरण

दोडामार्ग : तंटामुक्त गाव मोहीमेचे ब्रीद हे शांततेतून समृद्धीकडे असे आहे. त्यामुळे शांततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शांतता ज्याठिकाणी असेल त्याच ठिकाणी समृद्धी नांदेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी के. सी. चौरे यांनी केले.दोडामार्ग तालुक्यातील तंटामुक्त पुरस्कारप्राप्त गावांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात तहसील कार्यालयाच्या सभागृहात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आदी उपस्थित होते.दोडामार्ग तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेतील पुरस्कारप्राप्त गावांना प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना चौरे म्हणाले, प्रत्येकाने आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. मग कोणताही प्रश्न सहज सुटेल. गावात असणारा तंटा, वाद- विवाद तडजोडीने सोडविण्यावर भर दिला गेला पाहिजे. हे सर्व झाले तर गावाची शांतता टिकून राहील. प्रत्येक गावाने असा प्रयत्न केला की, तालुका आपोआप तंटामुक्त होईल. यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करायला हवी. तहसीलदार संतोष जाधव, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनीही यावेळी समयोजित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)