शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीयांनी काढला मूक मोर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 1:24 PM

मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर)  कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर)  कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच काळ्या फिती बांधून कणकवली शहरातून प्रकल्पबाधितांनी प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला. या सर्वपक्षीय मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद लाभला.

गुरुवारी सकाळी 9.30 वाजता काढण्यात आलेल्या मूक मोर्चाच्यावेळी प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर, विशाल कामत, महेश नार्वेकर, संदेश पारकर, राजन तेली, अबिद नाईक, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, रूपेश नार्वेकर, विलास कोरगावकर, अनिल शेट्ये, शिशिर परुळेकर, संजय मालंडकर, सुजीत जाधव, नितिन पटेल, विठ्ठल देसाई, राजन परब,प्रदीप मांजरेकर, भुषण परुळेकर, रत्नाकर देसाई, रामदास मांजरेकर, चंदू कांबळी, बाळा बांदेकर, सचिन म्हाडगुत, यशवंत महाडिक आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणकवली बंद आंदोलनाला विविध राजकीय पक्ष तसेच संघटनानी पाठिंबा दिला होता. यामध्ये व्यापारी महासंघ, रिक्षा संघटना, स्टॉल संघटना, बेकरी संघटना, हॉटेल मालक संघटना, कणकवली तालुका मुस्लिम संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, विदेशी मद्य विक्रेते संघटना, जिल्हा फुटवेअर असोसिएशन, रोटरी क्लब,सुवर्णकार संघटना, टेम्पो चालक -मालक संघटना अशा विविध संघटनांचा समावेश होता. नागरिकही या बंदमध्ये सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आले होते. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महामार्ग चौपदरीकरणासाठी भुसंपादन करताना चुकीची प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कणकवली बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. परमहंस भालचंद्र महाराज आश्रम परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिराकडून  पटकीदेवी मंदिर ते बाजारपेठ मार्गे पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. कणकवलीकरांना गृहीत धरून जर प्रशासनाने या लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच कणकवलीत महामार्गाचे काम कुठल्याही परिस्थितीत करु दिले जाणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णतः प्रशासन व शासनाचीच राहील, असा इशाराही यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी हातात धरलेल्या फलकांच्या माध्यमातून दिला.

टॅग्स :highwayमहामार्गgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण