सावंतवाडी : हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला व मध्यरात्रीच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला. या सर्व प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी व्हावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील प्रांत कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी समाज मंदिर ते गांधी चौक आणि गांधी चौक ते प्रांत कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना महेश परुळेकर, आम्ही भारतीयचे अॅड. संदीप निंबाळकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले तसेच उत्तर प्रदेश मधील घटनेचा निषेध केला.निवेदन येथील प्रांत कार्यालयात देण्यात आले. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष तेजस पडवळ, महिला आघाडीप्रमुख भावना कदम, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वाय. जी. कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम, अंकुश जाधव, प्रदीप कांबळे, मनीषा सांगेलकर, भिकाजीजाधव, मोहन जाधव आदींच्या सह्या आहेत.
सावंतवाडी शहरात निषेध रॅली, वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:43 PM
Hathras Gangrape, wanchitbhaujanahghadi, sindhudurg, sawantwadi हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला व मध्यरात्रीच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला. या सर्व प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी व्हावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील प्रांत कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली.
ठळक मुद्देसावंतवाडी शहरात निषेध रॅली, वंचित बहुजन आघाडीचा एल्गारहाथरसमधील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी