कणकवली : नाणार रिफायनरी प्रकल्पात माझी दलाली असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे . मात्र, दलाली असल्याचे त्यांनी पुराव्यासह सिद्ध करावे . तसेच नाणार परिसरात माझी एक फूट तरी जागा असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे . हे त्यांनी सिद्ध केले तर मी फासावर देखील जायला तयार आहे . पण त्यांचे आरोप खोटे ठरले तर खासदार राऊत यांनी कणकवलीतील मुख्य चौकात जाहीर माफी मागावी. असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले आहे.कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रवींद्र शेट्ये , शिशिर परुळेकर , चंद्रहास सावंत आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते .प्रमोद जठार म्हणाले , राज्य सरकारने ३५ हजार कोटींचे ११ प्रकल्प राज्यात आणण्याची घोषणा केली आहे . पण त्यांना रत्नागिरी - सिंधुदुर्गात ३ लाख कोटींचा आणि एक लाख थेट रोजगार देणारा नाणार येथील रिफायनरी प्रकल्प नको आहे . ही दुदैवाची बाब आहे . दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या दालनात मी गेल्यानंतर तेथील चर्चेवरून खासदार राऊत रिफायनरी प्रकल्पाला का विरोध करत आहेत ही बाब माझ्या लक्षात आली .सीएसआर फंडातून खासदार राऊत यांनी दोन शौचालये मागितली होती . कामाच्या गडबडीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान ते विसरून गेले . मात्र, शौचालये न मिळाल्याने खासदार राऊत यांनी रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्याचा विडा उचलला आहे . असा आरोप जठार यांनी यावेळी केला.विकास थांबविणारा खासदार !२०१३ मध्ये विनायक राऊत मला नागपूर येथील शिवसेनेच्या बैठकीत घेऊन गेले. पक्ष प्रमुखांसमोर त्यांनी शिवसेनेत या खासदार व्हाल असे मला सांगितले. मात्र, मी ते नाकारले. तुम्हीच खासदारकीला उभे रहा.असे त्यांना सांगितले. हे त्यांनी आता नाकारावे. युतीचा धर्म पाळून आम्ही राऊत यांना दोन वेळा खासदार म्हणून निवडून आणले.तेच आता आमच्यावर आरोप करीत आहेत. कोकणचा विकास थांबविणारा आमचा खासदार आहे . हे आमचे दुर्दैव आहे. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.
दलाली सिद्ध करा अन्यथा भर चौकात माफी मागा :प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 5:41 PM
politics, Pramod Jathar, Vinayak Raut, sindhudurg, nanar refinery project नाणार रिफायनरी प्रकल्पात माझी दलाली असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे . मात्र, दलाली असल्याचे त्यांनी पुराव्यासह सिद्ध करावे . तसेच नाणार परिसरात माझी एक फूट तरी जागा असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे . हे त्यांनी सिद्ध केले तर मी फासावर देखील जायला तयार आहे . पण त्यांचे आरोप खोटे ठरले तर खासदार राऊत यांनी कणकवलीतील मुख्य चौकात जाहीर माफी मागावी. असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले आहे.
ठळक मुद्देदलाली सिद्ध करा अन्यथा भर चौकात माफी मागा प्रमोद जठार यांचे राऊत यांना आव्हान