शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

खेळाडूंना सर्व सुविधा पुरविणार

By admin | Published: March 30, 2015 8:38 PM

दीपक केसरकर : सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

सावंतवाडी : कबड्डी खेळाडूंसाठी सावंतवाडी शहरात गॅलरी उभी करावी, यासाठी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह वरिष्ठ पातळीवर चर्चा करून गॅलरीसाठी प्रयत्न करणार व सिंधुदुर्गातील सर्व क्षेत्रातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पुणेरी पलटन युवा प्रतिभा शोध २०१५ व जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन येथील जिमखाना मैदानावर रविवारी करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, पुणेरी पलटन संघाचे व्यवस्थापक राहुल सापटे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, सिंधुुदुर्ग जिल्हा युथ अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गावडे, डॉ. कश्यप देशपांडे, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ संस्थापक विजयदादा जाधव, राष्ट्रीय खेळाडू पुणे पलटन सागर खटाळे, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळचे सचिव अजय जाधव, अध्यक्ष उमाकांत वारंग, उपाध्यक्ष श्रीपाद शास्त्री, खनिजदार गणेश जाधव, नगरसेवक संजय पेडणेकर, नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे आदी उपस्थित होते. पुणेरी पलटन युवा प्रतिभा शोध हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धा राबवित आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगल्या खेळाडूंना व्यासपीठ मिळेल, अशी आशा यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केली. सागर बांदेकर, विजय जाधव यांच्यासारख्या चांगल्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात. येत्या काही महिन्यात कुमार गटाची स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच आपली क्रीडाशक्ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरा, असा सल्लाही केसरकर यांनी दिला. ग्रामीण भागात खेळाडूंना सुवर्णसंधी पुणेरी पलटन युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत आहे. या सामन्यात आपले कौशल्य दाखवावे. अशा स्पर्धा महाराष्ट्रभर घेऊन युवा प्रतिभा शोध घेणार असल्याचे पुणेरी पलटन संघाचे व्यवस्थापक राहुल सापटे यांनी सांगितले. यावेळी कबड्डीतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्रेहा टिळवे, अर्चना अशोक देसाई, कल्पना अरुण चौगुले, दिया सावंत, युक्ता प्रमोद सावंत, महेश गिरकर, गणेश जाधव, सुनील पेडणेकर, दिनेश चव्हाण, किरण धारपवार, संजय पेडणेकर, रमा पेडणेकर, नितीन हडकर, बाबली बांदेकर, शैलेश नाईक या सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)जिल्ह्यासाठी अकरा कोटींचा पायलट प्रकल्प - साळगावकरनगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अकरा कोटींचा पायलट प्रकल्प राबविणार असून क्रीडाविषयक धोरण तयार केले आहे. यासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून सावंतवाडीत प्रकल्प उभारण्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.