कणकवली: कणकवली येथील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. कणकवली हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्टेशन असून येथे तातडीने सर्व सुविधा द्या, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने रेल्वे स्टेशन मास्तरांकडे केली. यावेळी रेल्वेचे कर्मशिअल सुपरवायझर आवळेगावकर यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यांनी आपण कणकवलीला भेट देत सर्व्हे करून आवश्यक सुविधा देऊ, असे आश्वासन दिले.कोकण पाटबंधारे महामंळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव, तेजस राणे, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, दिव्या साळगावकर, शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळके आदींनी स्टेशनमास्तरांची भेट घेत चर्चा केली.रेल्वे स्टेशनवरील पाण्याची सुविधा बंद आहे. प्लॅटफॉर्म तिकीट घेतले जाते पण प्रवाशांना सुविधा नाहीत. दोन्ही ठिकाणी प्लॅटफॉर्मवर पुरेशी शेड नाहीत. स्टेशनवर स्वच्छता आवश्यक आहे. यासह आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर कर्मशिअल सपुरवायझर आवळेगावकर यांनी लवकरात लवकर कणकवलीला भेट देऊन समस्यांबाबत सर्व्हे करून आदी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
कणकवली रेल्वे स्टेशनवर सुविधा द्या!, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी
By सुधीर राणे | Published: September 08, 2022 1:04 PM