माकडतापाने बळी पडलेल्या मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतून तत्काळ मदत देणार सिंधुदुर्गनगरी : माकडतापाने बळी पडलेल्या मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतून तत्काळ मदत देणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.माकडतापासंदर्भात केसरकर यांनी बांदा आरोग्य केंद्राला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, बांदा येथील माकडतापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी साथ बाधीत गावांत चोविस तास विेशेष आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय मृत माकडांची विल्हेवाट लावण्यासाठी व सर्व्हेक्षण करण्यासाठी वनखात्याकडून ५0 वन कर्मचारीवर्गांचे जादा पथक कार्यरत करण्यात आले आहे.पालकमंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी प्रशासनाला निष्काळजी आणि हलगर्जीपणा न करण्याचा सक्त आदेश दिला आहे. यासंदर्भात रोजचा रोज पाठपुरावा करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच माकडताप फैलावू नये म्हणून आरोग्य यंत्रणा व वनखात्याला त्यांनी सूचना केल्या आहेत.त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, आरोग्य अधिकारी डॉ. साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी, सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सतीश कदम, पशुसंवर्धन उपायुक्त पठाण, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच बाळा आकेरकर, डॉ. जगदीश पाटील, आदी उपस्थित होते.ग्रामस्थांशी चर्चा यावेळी बांदा येथील ग्रामस्थांशीही त्यांनी चर्चा केली. त्यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शासन पुरेसा निधी आणि यंत्रणा पुरविणार अस ल्याचे ग्वाही केसरकर यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
माकडतापाने बळी पडलेल्या मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतून तत्काळ मदत देणार
By admin | Published: March 07, 2017 11:21 AM