शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 3:29 PM

CoroanVirus Sindhudurg Uday Samant : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देप्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूदजिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभारणार- उदय सामंत यांची माहिती

ओरोस : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अतिशय घातक आहे. याचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या लहान मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने घरच्यासारखी वागणूक दिली जाईल, असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.दरम्यान, प्लाझ्मा थेरपीचे मशीन जिल्ह्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर २५ लाख रुपयांची तरतूद या मशीनसाठी केली आहे. आता या थेरपीबाबत मतमतांतरे असली तरी त्याचा फायदा भविष्यात जिल्ह्यातील रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मंत्री सामंत म्हणाले, लॉकडाऊनला प्रतिसाद दिला त्या जिल्हावासीयांचे आपण आभारी आहोत. त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्ण कमी होण्यास होत आहे. त्यामुळे निश्चितच कोविड रुग्णांची वाढलेली संख्या भविष्यात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने माझा सिंधुदुर्ग - माझी जबाबदारी अशी मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत २ लाख ९० हजार १२ लोकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा तत्काळ उपचार करण्यासाठी झालेला आहे. ही मोहीम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाली असून, ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.लसीचा तुटवडा भासणार नाहीलसीचा तुटवडा आता भासणार नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री सामंत यांनी सिंधुदुर्गचा मृत्युदर कमी करण्यासाठी आमचे जिल्हा प्रशासन म्हणून प्रयत्न आहेत, असे सांगितले. आगामी काळात शिक्षकांना व फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांना लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. लॉकडाऊन वाढणार का? याबाबत विचारले असता त्यांनी अद्यापपर्यंत आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे सांगून अधिक बोलणे त्यांनी टाळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग