शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

सर्वसामान्यांची फरपट

By admin | Published: November 09, 2016 11:00 PM

सुट्या पैशांसाठी शोधाशोध : जिल्ह्यात खरेदीसाठी आलेल्यांची कुचंबणा

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५00 व १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्यांची चांगलीच फरपट झाली. काही जणांनी बँकांमध्ये धाव घेतली पण बँका बंद असल्यामुळे लोकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. बाजारपेठेतही लोकांची कुचंबणा झाली. हॉटेल, दुकानदार, वीज मंडळाचे अधिकारी, एस. टी. महामंडळ आदी सर्व ठिकाणी ५00 रुपयांच्या नोटा घेणे बंद केल्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसला. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीज बिल भरणा करताना ५00 रुपयांच्या नोटा घेणे बंद केले. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्यांची सुटे पैसे शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली. यावेळी ग्राहकांशी बाचाबाचीही झाली. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लढविलेली शक्कल चांगली आहे, मात्र यामध्ये सर्वसामान्यांची झालेली फरपट संतापजनक असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली. श्रीमंत लोकांनी घरात लपवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जरी ही शक्कल पंतप्रधान नरेंद्र मोदी व रिझर्व्ह बँकेने शोधली असली तरी यामध्ये सर्वसामान्यच जास्त भरडले गेले आहेत. बँकांचे व्यवहार आणखी काही दिवस सुरळीत होईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. (वार्ताहर) पेट्रोल पंपावरही गैरसोय पेट्रोल पंपावरही दुचाकीचालकांची गैरसोय झाली. सुटे पैसे कमी पडल्यामुळे ५00 रुपये सुटे देण्याचे पेट्रोल पंपचालकांनी बंद केले. ५00 रुपयांच्या बदली सुटे पैसे मिळणार नाहीत. सरळ ५00 रुपये पेट्रोलची खरेदी करावी, असा नामफलक लावून ठेवल्यामुळे वाहनचालकांचीही गैरसोय झाली.तर काही ठिकाणी ५०० रुपयांच्या बदल्यात पेट्रोल देण्याचे बंद करण्यात आले होते. हॉटेल मालकांचाही पैसे देण्यास नकार ५00 रुपये स्वीकारण्यास हॉटेल मालकांनीही नकार दिल्यामुळे ग्राहक पूर्णत: हैराण झाले. बुधवारी दिवसभर ५00 रुपयांच्या नोटांबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू होती. बँका अचानक बंद बुधवारी बँकांना सुट्टी दिल्यामुळे संभ्रम आणखीनच वाढला. एटीएमही बंद असल्याचे फलक झळकल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. लोकांना सुटे पैसे मिळेनासे झाल्यामुळे बऱ्याच जणांचे हाल झाले. मेडिकल, पोस्ट, कणकवली उपजिल्हा रुग्णालय या व्यतिरिक्त कोणीही ५00 रुपये स्वीकारत नसल्यामुळे गैरसोय झाली. महिलेस अश्रू अनावर! कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेतून उतरलेल्या महिलेचे अश्रू अनावर झाले. तिच्याकडे फक्त ५00 रुपयांच्या दोन नोटा होत्या. त्या चालणार नसल्यामुळे आपण घरी कशी पोहोचणार या भीतीने ती महिला घाबरली. अखेरीस सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी त्या महिलेला १00 रुपयांच्या ५ नोटा देऊन तिची समस्या दूर केली. महिलावर्ग अडचणीत घरखर्च चालविताना नाकीनऊ येणाऱ्या महिलावर्गाची तर या ५00 रुपयांच्या नोटांच्या समस्येने तारांबळ उडाली. सिलेंडरसाठी ठेवलेले ५00 रुपये चालणार नसल्यामुळे अनेक महिला अडचणीत आल्या. एकाएकी मोदींनी घोषणा करून सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. शासनाने सिलेंडरसाठी पॅनकार्ड व आधारकार्ड पाहिजे अशी अट घातल्यामुळे व आधारकार्ड नसेल तर अनुदान मिळणार नाही, अशी घोषणा केल्यामुळे जशी दाणादाण उडाली होती, त्यापेक्षाही मोठी तारांबळ सर्वांचीच उडाली. ग्राहकांनी पेट्रोलियम उत्पादनाचा अनावश्यक साठा करू नये, १९ पर्यंत नोटा स्वीकारणार देशातील प्रत्येक पेट्रोल व सीएनजी पंप आणि गॅस वितरकांकडे १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या इंधन व तत्सम उत्पादनाच्या खरेदीसाठी ५00 व १ हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यात येतील. देशभरात सर्व पेट्रोलियम उत्पादने, तेल कंपन्यांच्या वितरण व्यवस्थेद्वारे नियमितपणे उपलब्ध होतील. ग्राहकांनी पेट्रोलियम उत्पादनाचा अनावश्यक साठा करू नये आणि त्यांच्या दैनंदिन अथवा तातडीच्या गरजे इतक्याच पेट्रोलियम पदार्थांची खरेदी करावी. नवीन चलनव्यवस्थेमध्ये सहजरित्या अवस्थांतर होण्याकरिता तेल कंपन्यांना पूर्ण सहकार्य करावे. - इंडियन आॅईल, हिंदूस्थान कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, तेल कंपन्या, भारत सरकार