शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

LokSabha2024: जाहीर सभा घेऊन मतदानात फरक पडतो का?

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 8, 2024 12:46 IST

जाहीर सभांमुळे मतांमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही

सिंधुदुर्ग : निवडणूक काळात जाहीर सभांमुळे वातावरण निर्मिती होते, हे खरे असले तरी त्याचा मतांवर फारसा फरक पडत नाही, असे चित्र या निवडणुकीतून समोर आले आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपापले पारंपरिक गड राखले आहेत. जाहीर सभांमुळे मतांमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही.कोणत्याही निवडणुकीसाठी जाहीर सभा घेतल्या जातातच. प्रचारासाठी वातावरण निर्मिती करणे हा त्यातील मुख्य उद्देश असतो. तो साध्य होतोच. पण सभा झाली म्हणून मतांमध्ये फरक पडला असे चित्र या मतदारसंघात दिसले नाही. प्रत्येक उमेदवाराने आपापला गड राखला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात राऊत आणि सिंधुदुर्गात राणे मताधिक्य घेतील, हे आधीपासूनच निश्चित होते आणि तसेच झाले. उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मेहनत यावरच निवडणुकीतील जयपराजप ठरतो.

महायुतीचे नारायण राणे ४७,८५८ मताधिक्याने विजयी

  • या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला आहे.
  • राणे यांच्यासाठी अधिक जाहीर सभा झाल्या. राऊत यांनी खळा बैठकांवर अधिक भर दिला.

कोणाच्या किती सभा?अमित शाह : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. मात्र, रत्नागिरी मतदारसंघात राणे यांना १० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले.उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्यासाठी कणकवली व रत्नागिरीत सभा घेतली. मात्र त्यांचे रत्नागिरीत मताधिक्य घटले तर कणकवलीत सर्वात मोठा फटका बसला.राज ठाकरे : राज ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेतली. तेथे राणेंना मोठे मताधिक्य आहे. पण सभेपेक्षाही राणे यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले.देवेंद्र फडणवीस : फडणवीस यांनी राजापुरात राणे यांच्यासाठी सभा घेतली. मात्र, तेथे विरोधी उमेदवार विनायक राऊत यांनी २१ हजारांचे मताधिक्य घेतले आहे.

नियोजन महत्त्वाचेसिंधुदुर्गात राणे यांचे वर्चस्व असल्याने राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यावर अधिक लक्ष दिले. त्याची कल्पना असल्याने राणे यांनी सिंधुदुर्गातून अधिक मताधिक्य मिळविण्याचे नियोजन केलेच, शिवाय त्यांनी रत्नागिरीतील विनायक राऊत यांचे मताधिक्य घटवण्यावरही भर दिला आणि या नियोजनामुळेच त्यांना विजय मिळू शकला.

इतर नेत्यांच्या सभाया मतदारसंघात उद्धवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही दोन्ही जिल्ह्यांत सभा झाली. उद्धवसेनेचे वरुण सरदेसाई यांनी चिपळूण, सावंतवाडीमध्ये रोड शो केला. त्यामुळे त्या-त्यावेळी राजकीय वातावरण निर्मिती झाली, पण मतांमध्ये फरक पडला असल्याचे निकालात दिसले नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल