कणकवली :सिंधुदुर्गातील जनतेची सेवा करता करता माझ्या राजकारणातील बराचसा काळा मागे पडला आहे. छोट्या मोठ्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी करत आहे.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या समर्थ साथीमुळे कोकणचे यशस्वी नेतृत्व आम्ही करत आहोत. विरोधी पक्षाची उणिव भरून काढण्याचे काम माझ्या सारखा कार्यकर्ता सातत्याने करत आहे. या पुढील काळात जनतेची सेवा हाच खरा धर्म समजून काम करत राहणार असल्याचा विश्वास मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.
कणकवली येथे परशुराम उपरकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने सत्कार जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रल्हाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अणाव सरपंच आप्पा मांजरेकर, पास्कल फर्नांडीस, अमोल खानोलकर, संतोष सावंत, शैलेंद्र नेरकर ,अनिल राणे, वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, बाळा पावसकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, माझ्या राजकीय वाटचालीत असंख्य सहकाऱ्यांनी सातत्यपुर्वक साथ दिली आहे. त्यामुळेच सिंधुदुर्गातील आणि कोकणातील विविध प्रश्नावर आवाज उठविण्याची उर्जा मला मिळत राहिली आहे. महामार्गाचा प्रश्न असो किंवा मच्छिमारांचा प्रश्न असो, या प्रश्नांसह विजवितरण, बीएसएनलएल, प्रशासनाच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे आवाज उठविण्याचे काम आम्ही करत आहोत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही पाईक असून सर्वसामान्यांचा आवाज मनसेच्या माध्यमातून आम्ही उठवत आहोत. भविष्यात जनकल्याणासाठी आमची लढाई सातत्यपुर्वक सुरू राहील असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपरकर याना शुभेच्छा दिल्या .यावेळी त्यांची पत्नी प्रणाली, मुलगा प्रणव, मुलगी पुर्वजा आदी उपस्थित होते.
कणकवली येथे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते़ उपस्थित होते.