शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

जनता गुण्यागोविंदाने नांदेल असे काम करेन :

By admin | Published: July 18, 2016 10:51 PM

दीपक केसरकर

सावंतवाडी : सावंतवाडीतील माझ्या लोकांनी उच्च शिखरावर नेवून बसवले आहे. त्यांचा विसर मी कधीच पडू देणार नाही. पण गृहराज्यमंत्री या नात्याने राज्य गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी सर्व प्रयत्न करेन, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले.येथील बॅ. नाथ पै सभागृहात दीपकभाई मित्रमंडळीच्यावतीने दीपक केसरकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीे येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणावर विधानसभा सभागृहात निवेदन सादर करायचे असल्याने ते उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला तसेच मार्गदर्शन केले.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, संजय भोगटे, प्रकाश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेविक साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत, कीर्ती बोंद्रे, अफरोझ राजगुरू, शुभांगी सुकी, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, बाबू कुडतरकर, अनिता भाईडकर, भाई देऊलकर, काशिनाथ दुभाषी, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.यावेळी गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी आज काही कारणाने अनुपस्थित रहात आहे. पण येथील जनतेने माझ्यासाठी जे काही केले आहे, ते मी कधीही विसरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखणे जशी आपली जबाबदारी आहे, तसाच महाराष्ट्राकडेही लक्ष द्यायचा आहे. राज्यात गुण्यागोविंदाने लोक नांदले पाहिजेत, असा माझा प्रयत्न आहे. तशी जबाबदारीच माझ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ती मी आपल्या सहकार्याने पूर्ण करेन, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. निधी आला पाहिजे, यादृष्टीने माझा प्रयत्न असणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले.नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दीपक केसरकर यांच्याशी माझे गेल्या २० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्या घरात कोणीही राजकारणात नसताना दीपक केसरकर यांनी घेतलेली झेप बघण्यासाठी त्यांचे आईवडील असायला हवे होते. पण आज ते नाहीत. त्यांना मुलाच्या यशाचा अधिक आनंद झाला असता, असेही ते म्हणाले. येथील जनतेने केलेले प्रेम ते कधीही विसरणार नाहीत, असे अभिवचनही साळगावकर यांनी यावेळी दिले. महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी राजन पोकळे, प्रकाश परब यांनीही आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)