मालवण : कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा प्रसाद परुळेकर (३२) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राहत्या घरातील खोलीत पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतची माहिती दीर अवधूत परुळेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.कुंभारमाठ येथे वास्तव्यास असलेल्या परुळेकर या कुंभारमाठ ग्रामपंचायतीमधून स्वाभिमानच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. शनिवारी सकाळी ६.४० वाजण्याच्या दरम्यान त्यांची जाऊ यांना पूजा यांनी घरातील पंख्यास ओढणीने गळफास लावल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच घरातील अन्य मंडळींनी त्या खोलीकडे धाव घेतली. गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांना पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थांनी परुळेकर यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, डी. व्ही. जानकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रसाद परुळेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात सासरे, पती, मुली, दीर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा परुळेकर यांची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 4:57 PM
कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा प्रसाद परुळेकर (३२) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राहत्या घरातील खोलीत पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतची माहिती दीर अवधूत परुळेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.
ठळक मुद्दे पूजा परुळेकर यांची गळफासाने आत्महत्यापरुळेकर कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या