शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Published: April 14, 2017 11:10 PM

दीपक केसरकर यांची माहिती; किल्ला पर्यटनासाठी ५० कोटी खर्च करणार

मालवण : पर्यटन हंगामात दरवर्षी किल्लावासीय तसेच पर्यटकांना पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी किल्ल्यातीलच ऐतिहासिक दोन तलावांचे पुनरूज्जीवन करून मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.पुनरुज्जीवन करण्यात येणाऱ्या तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी ‘आरओ’ यंत्रणा उभारली जाईल. किल्ले दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने वर्षभरात ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.मालवण येथे पालकमंत्री केसरकर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, यूएनडीपी, पुरातत्त्व विभाग, महसूल, तसेच किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक पार पडली. शिवराजेश्वर मंदिर सुशोभीकरण, मसुरे भरतगड किल्ला, हडी बेट, आदींचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून, जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील गावांचा प्रामुख्याने विकास केला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बबन शिंदे, पंकज साधये, सन्मेश परब, महेश मांजरेकर, किसन मांजरेकर, मंगेश सावंत, प्रेरणोत्सवचे गुरू राणे, भाऊ सामंत, ज्योती तोरसकर, दीपक मयेकर यांच्यासह प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे प्रकाश चव्हाण, प्रदीप पाटील, नायब तहसीलदार सुहास खडपकर, पुरातत्त्व विभागाचे राजेश दिवेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांसाठी ‘टेंट रिसोर्ट’ची उभारणीकिल्ला विकासासाठी संयुक्त आराखडा बनविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. किल्ल्यात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी ‘टेंट रिसोर्ट’ची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या आवश्यक परवानग्यांची पूर्तता केली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.पुरातत्त्व विभागावर नाराजी : किल्ल्याची समस्या मांडताना मंगेश सावंत यांनी पुरातत्त्व विभागावर नाराजी व्यक्त केली. तटबंदीवर भलेमोठी पाळे घुसल्याने तटबंदी कमकुवत बनत चालली असून, याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही सावंत यांनी पालकमंत्र्यासमोर केला. यावर पुरातत्त्वच्या दिवेकर यांनी वेळोवेळी तटबंदीवरील पाळे काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. याला किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.