शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

By admin | Published: April 07, 2017 10:57 PM

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे बांधकामला निवेदन : रस्त्यांची कामे दर्जेदार करुन घ्या अन्यथा आंदोलन करणार

कणकवली : सिंधुदुर्गातील काही ठेकेदार हे मजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करीत आहेत. मात्र, ही कामे निकृष्ट होत असल्याने त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. तसेच काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी बांधकाम खात्याची तज्ज्ञ मंडळी असावीत अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बासुदकर यांना दिले. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशीर परुळेकर, महिला तालुकाध्यक्षा गीतांजली कामत, युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू पुजारे, दीपक दळवी, समर्थ राणे, प्रितम मोर्ये, प्रवीण पाटील आदींनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बासुदकर यांची भेट घेतली . तसेच निकृष्ट कामांबाबत जाब विचारला. तालुक्यात सातत्याने निकृष्ट कामे होतात. गतवर्षी झालेल्या डांबरीकरणानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर खड्डे पडतात. यात जनतेचा पैसा वाया जातो. असे प्रकार रोखण्यासाठी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी आग्रही मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. कणकवली तालुक्यात अनेक रस्त्याचीे कामे निकृष्ट झाली आहेत. ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर निकृष्ट काम काढून टाकून तेथे पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात अशी वारंवार आंदोलने होऊ नयेत यासाठी बांधकामच्या अधिकाऱ्यांनीच कामावर आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवायला हवे अशी मागणी यावेळी परुळेकर यांनी केली. बांधकामच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामावर बारकाईने लक्ष ठेऊन दर्जेदार काम करून घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. कणकवलीसह जिल्ह्यात सुरू असलेल्या निकृष्ट कामांबाबत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तक्रार केली असल्याचेही भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात भाजपचे सरकार असल्याने रस्ते व इतर विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी आला आहे. या निधीचा निकृष्ट कामे करून गैरवापर होत असेल, तर भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. तालुक्यात कुठेही निकृष्ट कामे सुरू असतील तर ती तातडीने थांबविली जातील तसेच बांधकामच्या अधिकाऱ्यांनाही शांत बसू देणार नाही असा इशारा शिशीर परुळेकर यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)