देवरुख : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या ‘कृषितज्ज्ञ’ आठ कर्मचाऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाने गेल्या महिनाभरापासून वाऱ्यावरच सोडले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्याप अधिकारीच उपलब्ध होऊ शकलेले नसल्याने पाणलोटच्या त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.हे कंत्राटी कर्मचारी ५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे या कार्यालयात कृषितज्ज्ञ या पदावर कंत्राटी म्हणून कामावर होते. मात्र, पाणलोट विकास कार्यक्रम पूर्ण झालेला नसतानाही तालुका कृषी विभागाने आठ कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरच सोडले आहे. इतर तालुक्यांप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात त्यांना पुन्हा सामावून घेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच हे स्थानिक कर्मचारी संतापले आहेत.यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे जिल्हा पातळीवरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून नेत्यांची भेट घेऊन मांडले होते. याचा जाब विचारण्यासाठी तालुका कृषी कार्यालयावरच जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तालुका कृषी अधिकारी दिवाळीपूर्वी सुटीवर गेल्याने आपले म्हणणे मांडता येणार नाही, याची खात्री झाल्यावर दिवाळीपूर्वी १६ तारखेला सोमवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. सोमवारीही अधिकारी तालुका कृषी कार्यालयात न आल्याने दुसऱ्यांदा आपले म्हणणे त्या आठ कर्मचाऱ्यांना मांडता आले नाही.सुटी संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी कार्यालयात हजर राहतात. मात्र, सोमवारी तसे न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताहेत की? असा सवालच स्थानिकांच्या मनात उभा राहिला आहे.सोमवारी याबाबत त्यांच्याशी आमदारांनी संपर्क साधला असता दोन दिवसानंतर आपण भेटू, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात प्रकल्प कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामाईक मार्गदर्शक सुचना २००८ (सुधारित २०११) नुसार करण्यात आली आहे. यानुसारच हे स्थानिक ‘आठ कर्मचारी’ ‘कृ षितज्ज्ञ’ म्हणून या प्रकल्पांतर्गत संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयात कंत्राटी स्वरुपात काम करीत होते. त्यांचा नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५पर्यंत करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचे देखील असताना तालुका कृषी अधिकारी मुद्दामहून त्या स्थानिक आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलताना दिसत आहेत. म्हणूनच गेल्या महिन्यापासून ते कर्मचारी वाऱ्यावरच आहेत. मात्र त्यांची समस्या अजूनही ऐरणीवरच आहे. (प्रतिनिधी)हा प्रश्न ‘लोकमत’ने प्रथम लावून धरल्याने कृषी जिल्हा यंत्रणा स्तरावरुन हालचाली निर्माण झाल्या होत्या. तशी फोनाफोनी सुरु होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण ऐरणीवर आले आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्याने पाणलोटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही टांगताच आहे.संगमेश्वर तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयाचा मनमानीपणा.तालुका कृ षी अधिकारी करताहेत दुर्लक्ष; स्थानिकांना डावलण्याचा घाट.त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेत नसल्याने होतोय संताप.अन्य तालुक्यांप्रमाणेच सामावून घेण्याची होतेय मागणी.
पाणलोटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजून ऐरणीवरच!
By admin | Published: November 17, 2015 11:13 PM