कणकवली : सरकार कुठले आले तरी आपले प्रश्न सुटणार नाहीत, तर सामाजिक समता प्रस्थापित झाल्यानंतरच आपले प्रश्न सुटतील. आपले हक्क आपल्याला प्राप्त झालेच पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.कणकवली येथे सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकर बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी लोकशाही राष्ट्रवादी आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. रावसाहेब मोहन, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश सचिव वसंत साळवे, ज्येष्ठ सत्यशोधक कार्यकर्ते किशोर ढमाले, भारिप सिंधुदुर्गचे अध्यक्ष नाना डामरे, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्गचे अध्यक्ष सत्यवान जाधव, ओबीसी संघर्ष समितीचे संस्थापक शशिकांत आमणे, कणकवली बौद्धविकास संघाचे अध्यक्ष डी. डी. कदम, लोकशाही राष्ट्रवादी आंदोलन महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत कदम, मांग गारूडी समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष किशोर चौगुले, आदिवासी कातकरी समाजाचे सुनील पवार, समता प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमोल कांबळे, बौद्धसेवा संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप कदम, मालवण तालुका बौद्धसेवा समितीचे अध्यक्ष संजय कदम, वैभववाडी बौद्धसेवा संघाच्या शुभांगी पवारे, कुडाळ तालुका बौद्धसेवा संघ अध्यक्ष डी. बी. कदम, डी. के. पडेलकर, अंकुश कदम, तानाजी कांबळे, सुदीप कांबळे, वासुदेव जाधव, उमेश बुचडे, रचना तांबे, देवगड बौद्धसेवा संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, खारेपाटण बौद्धसेवा संघाचे अध्यक्ष मोहन पगारे, ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, वैश्यवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, ठाकूर समाजाचे जिल्हाध्यक्ष निलेश ठाकूर, कोष्टी समाजाचे जिल्हाध्यक्ष विशाल हर्णे, देवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर, चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन म्हाळगी, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सत्यवान नाटळकर, गोपाळ समाजाचे जिल्हाध्यक्ष देऊ होळकर, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काळे, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, वंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष मधुकर राठोड, लोहार समाजाचे जिल्हाध्यक्ष निलेश शिरवलकर, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुहास वरूणकर, मातंग समाज जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण व्होटकर उपस्थित होते.तसेच गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोसावी, मराठा समाजाचे युवा जिल्हाध्यक्ष सुशिल सावंत, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश राणे, दीपाली तेंडोलकर, सोनार समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीपाद तोडणकर, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच अध्यक्ष किशोर चव्हाण, स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश राणे, कणकवली तालुका मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निसार अहमत काझी आदी जिल्ह्यातील सर्व समाजांचे अध्यक्ष उपस्थित होते.भीमराव आंबेडकर पुढे म्हणाले, लाभापासून जे वंचित राहिले आहेत त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या बहुजन समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत, लोकसभेत निवडून जाणे गरजेचे आहे. सामाजिक व आर्थिक विषमता वाढीस लागली आहे. महाराष्ट्राने महापुरुष दिले आहेत. त्याच महाराष्ट्रात अजूनही अत्याचार होत आहेत. ते थांबले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी डॉ. बाबासाहेबांची प्रतिज्ञा वाचून दाखविली. प्रास्ताविक रश्मी पडेलकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. महेंद्र कदम यांनी आभार मानले.
दुपारनंतर सामाजिक व सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश सचिव वसंत साळवे व अभ्यासक किशोर ढमाले, महेश परुळेकर यांचे परिसंवाद झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा तांबे यांनी तर उपस्थितांचे आभार उत्तम जाधव यांनी मानले.भारतीय संविधानाची मूल्ये या विषयावर लोकशाही राष्ट्रवादी आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. रावसाहेब मोहन व अॅड. वैशाली किर्ते यांचा परिसंवाद या कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.