शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, अधिष्ठांताकडून दुजोरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:41 PM

ओरोस (जि. सिंधुदुर्ग ) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग ...

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, या प्रकाराला अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच येत्या मंगळवारी अँटी रॅगिंग कमिटीची बैठक घेऊन या तक्रारीवर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वरिष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगला सामोरे जावे लागले. रॅगिंगबाबत संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा रॅगिंग कमिटी अध्यक्ष डॉ. मनोज जोशी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. हा प्रकार सोमवार, मंगळवार या कालावधीत घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थ्यांना त्यांच्या रूमवर जाऊन आपल्या रूमवर घेऊन येत रॅगिंग केली असल्याचे समोर येत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाली असल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली आहे. याबाबत अँटी रॅगिंग कमिटीच्या बैठकीत चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल. - डॉ. मनोज जोशी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयCrime Newsगुन्हेगारी