शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

वेंगुर्ले तालुक्याला पावसाचा तडाखा, वाहतूक ठप्प, केळूस घाटातील दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:37 AM

वेंगुर्ले तालुक्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसाने तालुकावासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरसदृश परिस्थितीने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन काही ठिकाणी वाहतूक बंद होती. तर केळूस घाटीत अतिवृष्टीने दरड कोसळली. केळूस नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती.

ठळक मुद्देवेंगुर्ले तालुक्याला पावसाचा तडाखा, वाहतूक ठप्पकेळूस घाटातील दरड कोसळली

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसाने तालुकावासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरसदृश परिस्थितीने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन काही ठिकाणी वाहतूक बंद होती. तर केळूस घाटीत अतिवृष्टीने दरड कोसळली. केळूस नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती.पुराचे पाणी शेतीबागायतीत घुसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेंगुर्लेप्रमाणे मालवण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना सह्याद्री पट्ट्यातील कणकवलीसह अन्य भागात शुक्रवारी कडकडीत ऊन पडले होते.वेंगुर्ले तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४१.१५ मिलीमीटर पाऊस झाला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण १६५९.४३ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. काहीकाळ ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. शहरातील काही रस्त्यांवर पाणी आले, तर शिरोडा बाजारपेठेत साचलेले पाणी दुकानांत शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.वेंगुर्लेत पूरस्थिती निर्माण झाली असताना वेंगुर्ले तहसीलमधील नैसर्गिक आपत्कालीन कक्षाचा दूरध्वनी मात्र नादुरुस्त अवस्थेत होता. प्रशासनाने पूरस्थितीची कुठेही पाहणी न केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

तालुकानिहाय चोवीस तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ०८ (१८१४), सावंतवाडी २० (१३८७), वेंगुर्ले १५४.२ (१९९४.४४), कुडाळ २५ (१६३५), मालवण ४० (१३५४), कणकवली ५४ (१९१६), देवगड ०३ (१२६७), वैभववाडी २५ (१९०८) पाऊस झाला आहे.केळुसमधील मागासवर्गीय वस्तीला पुराच्या पाण्याचा वेढाकेळूस खालची मागासवर्गीय वस्ती परिसराला पुराच्या पाण्याने वेढले होते. रांजणवाडी व केळूस-मुणगी पूल पाण्याखाली गेल्याने कुडाळ तालुक्याचा केळूस गावाशी संपर्क तुटला तर केळूस घाटीत अतिवृष्टीने दरड कोसळली. वेंगुर्ले-परबवाडा ग्रामपंचायतीनजीकच्या मार्गावर पाणी आल्याने येथील नागरिकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागले.

दाभोली येथील ओहोळाने धोक्याची पातळी गाठली होती. होडावडा येथील पुलावर पाणी चढल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. वेंगुर्लेतील ओहोळातील पाणी शेतीबागायतीत घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. तर वेंगुर्ले कॅम्प परिसर पाण्याने वेढलेला होता.शिरोड्यात दुकानांत पाणी, रस्तेही बंदशिरोडा बाजारपेठेला पाण्याने वेढल्याने अनेक दुकानांत पाणी शिरून दुकानदारांचे नुकसान झाले. तर शेतीमध्ये पाणी घुसून अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचेही नुकसान झाले. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नदीनाले, ओहोळ दुथडी भरून वाहत होते. केळूस पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.कणकवलीत कडकडीत ऊनवेंगुर्ले, मालवण किनारपट्टीनजीकच्या भागात पाऊस कोसळत असताना कणकवलीत मात्र, सकाळपासूनच वातावरण पूर्णपणे निवळले होते. पावसाने पूर्णपणे उघडीप देत कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे जिल्ह्यात एका भागात पाऊस आणि दुसऱ्या भागात ऊन अशी विचित्र परिस्थिती पहायला मिळाली.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग