शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

सह्याद्रीच्या पट्ट्यात अवकाळी पावसाची हजेरी, फोंडाघाट येथे पडल्या गारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 5:11 PM

फोंडाघाट, लोरे, हरकुळ या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यापासून वादळ वारा आणि नंतर गारांचा जोरदार पाऊस पडला. तर कणकवली शहर परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला होता.

कणकवली : गेले दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अखेर अवकाळी पावसाचे आगमन झालेच. कणकवली तालुक्यात मंगळवारपासूनच फार मोठा उष्मा जाणवत होता. बुधवारी दुपारी सह्याद्रीच्या पट्ट्यात तुफान पाऊस कोसळला.फोंडाघाट, लोरे, हरकुळ या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यापासून वादळ वारा आणि नंतर गारांचा जोरदार पाऊस पडला. आंबोलीतही सायंकाळी गाराचा पाऊस कोसळला. यामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत बनले होते. तर कणकवली शहर परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला होता.हवामान विभागाने कोकणात ८ व ९ मार्चला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार वातावरणातही बदल झाला होता. सोमवारपासूनच उष्णतेच्या प्रमाणात अचानक वाढ होऊन पारा ४० अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे अचानक उष्णता वाढल्याने पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती.आंबा, काजू बागायतदार चिंतेतबुधवारी झालेल्या या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी उष्णतेचे प्रमाणही फारसे कमी झालेले नाही. या पावसाचा आंबा व काजू पिकावर परिणाम होणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ऐन आंबा, काजूच्या हंगामात पाऊस पडल्याने या दोन्ही पिकांना मोठा फटका बसणार आहे.

गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस