माणगाव : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात बुधवारी दुपारनंतर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. मागील चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे भातकापणीच्या कामाने वेग घेतला होता. मात्र, बुधवारी दुपारनंतर अचानकपणे दमदार पाऊस कोसळल्याने कापून ठेवलेले भात वाहून जावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.माणगाव परिसरात परतीच्या पावसाने कापलेले भात वाहून गेले आहे. माणगाव परिसरात मुसळधार ढगफुटी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले भात वाहून गेले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. हवामान विभागाने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दमदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता भातकापणीच्या हंगामातच शेतकऱ्यांसमोर आपत्ती जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस, कापून ठेवलेले भात गेले वाहून
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 30, 2024 7:11 PM