शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

पावसाचा कणकवली तालुक्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 4:48 PM

परतीच्या पावसाचा कणकवली तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्वरनगर, लांजेवाडी आणि वरवडे फणसनगर भागात मंगळवारी पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.

ठळक मुद्देपावसाचा कणकवली तालुक्याला फटकाकलमठ-महाजनीनगर, वरवडे-फणसनगर भागात घुसले पाणी

कणकवली : परतीच्या पावसाचा कणकवली तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्वरनगर, लांजेवाडी आणि वरवडे फणसनगर भागात मंगळवारी पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.

मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून कणकवली शहर व लगतच्या परिसरात तर सायंकाळी ४ वाजल्यापासून तालुक्यातील अन्य भागात मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत जोरदार बरसणाऱ्या पावसाने गडनदी तसेच जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.सह्याद्री पट्ट्यात मंगळवारी पडलेल्या धुवाँधार पावसाने जानवली नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास जानवली नदीलगतच्या कलमठ महाजनीनगर आणि कलेश्वरनगर भागात पाणी घुसले होते. या परिसरातील काही घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी चढले होते. तर गाड्याही पाण्याखाली गेल्या होत्या.कलमठ लांजेवाडी भागातही पाणी घुसले होते. कांदे व्यापारी थोरबोले यांच्या गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. तर वरवडे फणसनगर येथे सेंट उर्सुलानजीक पुलालगत आचरा-कणकवली रस्त्यावरही पाणी आले होते. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.तहसीलदार आर. जे. पवार यांनी स्वत: मध्यरात्री साडेतीन वाजता पुरसदृश भागात जात पाहणी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पाण्यात वेढलेल्या गाड्या व सामान बाहेर काढण्यास नागरिकांना मदत केली.कणकवलीतील जानवली नदीवरील गणपती सान्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या परिसरातील घरांच्या परिसरात अचानक पाणी आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, काही वेळाने हे पाणी ओसरले. मंगळवारी तालुक्यातील काही विशिष्ट भागातच जोरदार पाऊस झाल्याने ढगफुटीसदृश वातावरण पहायला मिळाले. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. मात्र, पाऊस पडला नाही. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग