सिंधुदुर्ग : गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने कोकण परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने संपुर्ण कोकण पट्यात रेट अलर्ट दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज, सोमवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५१.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, सरासरी ३७.९ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण सरासरी १५६३.१ मि.मी. पाऊस झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीकडे तर काहींची धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे.तालुका निहाय आकडेवारी (आतापर्यंतचा पाऊस मिलीमीटर)देवगड- 15.7 (1341.5), मालवण- 33.3 (1488.1), सावंतवाडी- 45.6 (1864.2), वेंगुर्ला- 45.7 (1611.5), कणकवली- 35.6 (1404.5), कुडाळ- 51.6 (1692.6), वैभववाडी- 45.4 (1554.2), दोडामार्ग- 40.8(1749.7) असा पाऊस झाला आहे.
तिलारी प्रकल्पात ८६.६६ टक्के पाणीसाठातिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 374.254 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 86.66 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 5 हजार 132 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामध्ये डाव्या कालव्यातून 423.720 आणि सांडवामार्गे 4 हजार 708 क्युसेक विसर्ग होत आहे. तसेच जिल्ह्यातील कोर्ले सातांडी हा मध्यम प्रकल्प आणि 14 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा (सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात)मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-58.8810, अरुणा -6.1931, कोर्ले- सातंडी -25.4740
लघु पाटबंधारे प्रकल्प- शिवडाव-2.648, नाधवडे- 2.572, ओटाव- 1.608, देंदोनवाडी – 1.004, तरंदळे -3.056, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 1.932, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-1.150, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.097, दाभाचीवाडी- 1.545, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.067, कारिवडे – 1.055, धामापूर – 1.891, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.034, ओझरम – 1.819, पोईप – 0.885, शिरगाव – 0.414, तिथवली – 1.366, लोरे- 2.696
मृद व जलसंधारण प्रकल्प - विलवडे- 1.584, शिरवळ- 0.602, वर्दे-0.000, कोकीसरे-0.319, नानीवडे- 0.487, सावडाव-0.298, जानवली-0.834 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
नद्यांची पाणी पातळी (आज सकाळीपर्यंतची)तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.500 मी., कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.800 मीटर. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.700 मीटर. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.900 मीटर. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 1.230 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे.