कणकवली - कणकवली शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळ पासूनच पावसाचे वातावरण कणकवली शहरात होते. दुपारी २.३0 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. कणकवली पंचायत समिती अंतर्गत शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात पाणी घुसले होते. कर्मचाºयांनी कार्यालयाच्या भिंतीला छिद्र पाडून पाणी बाहेर काढले.सध्या दरदिवशीच पाऊस हजेरी लावत आहे. पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारीही अशीच काहीशी स्थिति होती. विज चमकण्यासह ढगांचा गड़गडाटही सूरु होता. दुपारी २.३0 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. कणकवली पंचायत समिती अंतर्गत येणा-या शिक्षण विभाग, कृषि विभाग, पशुसंवर्धन विभागाची कार्यालये पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती मागील दुस-या इमारतीत आहेत. पूर्वी याठिकाणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार होती.जोरदार पावसामुळे या इमारतीच्या अंगणात पाणी साचायला सुरुवात झाली. हे पाणी हळूहळू कार्यालयात शिरले. आत आलेले पाणी कार्यालया बाहेर जाण्यास काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे तेथील साहित्याचे नुकसान होऊ नये म्हणून कर्मचाºयांनी कार्यालयाच्या भिंतीला छिद्र पाडून पाणी बाहेर काढले.नरडवे रोड वरील रेल्वे ब्रिज खालीही पावसाचे पाणी साचल्याने या रस्त्यावरुन जाताना पादचारी तसेच वाहन चालकाना अडचण निर्माण झाली होती. इतर ठिकाणीही सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, या पावसाने तालुक्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद सांयकाळी उशिरापर्यंत येथील तहसील कार्यालयात झालेली नव्हती.
कणकवलीत पावसाचा जोर वाढला, शिक्षण विभागाच्या कार्यालयात घुसले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 9:58 PM