सिंधुदुर्गनगरी : गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नदी, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. जिल्ह्यात पावसाने २००० मिलीमीटरची सरासरी गाठली असून गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे.
अरूणा प्रकल्प ५१.७९ टक्के भरला असून देवघर धरणात ६०.५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यातील कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प व १५ लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून सुरू केलेल्या विसर्गात वाढ केली असून सध्या या धरणातून १३५.८० घनमीटर प्रती सेकंद इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प ८६.२० टक्के भरला असून धरणामध्ये गुरुवारी ३६७.५४९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तिलारी प्रकल्पामध्ये ८२.७२ टक्के पाणीसाठा होता.