सिंधुदुर्ग : वेधशाळेने कोकण किनारपट्टीत येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाच्या दिलेल्या इशाराप्रमाणे सिंधुदुर्गात सोमवारी सकाळपासूनच पावसाने संततधार बरसत हाहाकार माजविला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सतत कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार माजविला असून, कुडाळ तालुक्यातील पाट हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजचे मराळवाडी येथील बारावीत शिकणारे दोन विद्यार्थी ओहोळाला आलेल्या पुरात वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हे दोघेही मित्र असून, पाट हायस्कूलमध्ये बारावीत कॉमर्स शाखेत शिकत होते. दरम्यान, त्यांच्या या आकस्मित निधनाने पाट गावावर शोककळा पसरली असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. ओटवणेतील चार, तर सावंतवाडी-उभागुंडा येथील आठ घरांमध्ये पाणी घुसल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सावंतवाडी आगाराने चार एसटी फेऱ्याही रद्द केल्या आहेत. सावंतवाडी व बांदा बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. येथील गोठोस्कर मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असतानाच पाणी घुसल्याने वऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)पुराचे पाणी लग्नमंडपातसावंतवाडीतील गोठोस्कर यांच्या श्री मंगल कार्यालयात सोमवारी विवाह समारंभ होता. मात्र, रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने मंगल कार्यालयालगतच्या ओहोळाला पूर आल्याने सर्व पाणी मंगल कार्यालयात घुसले. त्यामुळे मंगल कार्यालयात वऱ्हाडी मंडळींचीे एकच तारांबळ उडाली. अनेक वस्तू पुरात वाहून गेल्या. पाण्यात खुर्च्याही तरंगत होत्या. मात्र, लग्नकार्य सुरळीत पार पडले.चोरद नदीला पूर; ४० गावांचा संपर्क तुटलापाचव्या दिवशीही मुसळधार : पावसाने आषाढ गाजविलारत्नागिरी : महिनाभर संततधार सुरू ठेवणाऱ्या पावसाने शेवटचे सलग पाच दिवस मुसळधार वृष्टी करून आषाढ महिना चांगलाच गाजविला. जिल्ह्यात जोरदार कोसळणाऱ्या सरींमुळे अनेक मार्गांवर दरडी, झाडे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. खेडमध्ये चोरद नदी पुलावरून पाणी वाहू लागल्याने तब्बल तीन तास ४0 गावांशी असलेले दळणवळण ठप्प झाले होते. आणखी दोन दिवस पावसाचा असाच जोर राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने चांगलाच जोर घेतला आहे. गतवर्षी जूनमध्ये वेळेवर सुरुवात होऊनही पावसाने जुलै आणि आॅगस्टमध्ये दडी मारली होती. त्यामुळे गतवर्षी सर्वांत नीचांकी पाऊस झाला होता. मात्र, गेल्या सप्टेंबरपर्यंतची म्हणजे तब्बल चार महिन्यांचा कोटा पावसाने यंदा जुलैअखेर पूर्ण केला आहे. त्यामुळे यावेळी शेतीची कामे पूर्ण झाल्याने बळिराजा समाधानी आहे.गत आठवड्यातील गुरुवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. जराही विश्रांती न घेता पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली; मात्र सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७९० मिलिमीटर (सुमारे ८ इंच) पावसाची नोंद झाली आहे.या २४ तासांत जोरदार वृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यावर दरड कोसळणे, जुनाट झाडे कोसळणे, आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार, शेणाली घाटात रस्त्यावर माती व झाड पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ते बाजूला केले आहे. मंडणगड-खेड रस्त्यावर कोसळलेली दरडही बाजूला करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.खेड तालुक्यातील खोपी फाट्यावर रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील शिरसोली शाळा क्र. १ ची भिंत पडली आहे. गुहागर - चिपळूण - कऱ्हाड रस्त्यावर झाड पडले होते, तेही बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. शेंबवणे (ता. संगमेश्वर) येथे एका गोठ्याचे
सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार
By admin | Published: August 02, 2016 12:04 AM