लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्'ात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्'ात मुसळधार कोसळणाºया पावसाने आज दुसºया दिवशी देखील आपला कहर सुरूच ठेवला. परिणामी ठिकठिकाणी पूरस्थिती होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. महामार्गावर कुडाळ येथील बेल नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर आचरा येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकल्याने थोडी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण भागात नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सुमारे २७ गावांचा संपर्क तुटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान सर्वांनाच पावसाचा फटका बसला असून बºयाच घरांची, शेतमंगरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पुढील ४८ तासात जिल्'ात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.जिल्हाला गेले तीन दिवस मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. सोमवार रात्री पासून सुरु झालेला पाऊस दुसºयांदा दिवशी रात्री उशिरापर्यं थांबण्याचे नावच घ्यायला तयार नव्हता. परिणामी जिल्'ात ठीक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. जिल्'ातील मुख्य सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. यात गडनदी, भंगसाळ नदी, जानवली नदी यासह ग्रामीण भागातही ओहळाना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळ जवळ सर्वच ठिकाणची भात शेती पाण्याखाली गेली होती.
सिंधुदुर्ग जिल्'ात १७ ते १९ सप्टेंबर कालावधीत सरासरी पाऊस २१५.४ मि मी इतका झालेला आहे. दि १ जून १७ ते १९ पर्यंत आज सकाळ पर्यंत जिल्'ात एकूण सरासरी पाऊस २८0८.२१ मि मि इतका झालेला आहे. १९ रोजी चा जिल्'ाचा एकूण पाऊस ९0२.२ मि मि झालेला असून सरासरी पाऊस ११२.७७ मि मी इतका झालेला आहे.जिल्ह्यातील अनेक पुले पाण्याखाली, वाहतूक बंदया पावसात दोडामार्ग तालुक्यातील भेडशी पुलावर, कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर व शिवापूर पुलावर, मालवण तालुक्यातील मालवण-बागायत, कांदळगाव-मसुरे , कसाल-वायंगवडे या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील पिट ढवळ पुलावर पाणी आहे ,मात्र पयार्यी पूल झाल्याने या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. कणकवली तालुक्यात वागदे सातरल कासरल पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून माहिती देण्याबाबत सर्वांना आदेशीत करण्यात आलेले आहे.मुंबई-गोवा महामार्ग काहीकाळ ठप्पकोसळणाºया मुसळधार पावसामुळे महामार्गावरील कुडाळ तालुक्यातील बेल नदीला पूर आल्याने सकाळी या नदीचे पाणी महामार्गावर आले होते. परिणामी काहीकाळ महामार्ग ठप्प झाला होता. यापूर्वी महामार्गावर पिठढवळ पुलावर पाणी येऊन महामार्ग ठप्प होत होता. मात्र या पुलाला जोडून लगतच नव्याने पूल बांधल्याने आता या पुलावरून वाहतूक सुरु आहे.२७ गावांचा संपर्क तुटलाग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका तेथील लोकांना बसला आहे. प्राथमिक माहिती नुसार जिल्'ातील सुमारे २७ गावांचा संपर्क तुटला होता. या ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.शाळा सोडल्या; पुरात बस अडकलीपावसाचा कहर पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्'ातील बहुतांश शाळा सोडल्या आहेत. आचरा गावातील हिरलेवाडी-गाऊडवाडी रस्त्यावर पावसाच्या व उधाणाच्या पाण्याने पूर येवून सदर रस्ता वाहतुकीस बंद झालेला होता. याच दरम्यान विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस या पुराच्या वेड्यात फसली. चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावरील पाण्यात स्कूल बस अडकली होती. मात्र पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने सदर मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरातमंगळवारी जिल्'ात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यात घरांची पडझड,गोट्यांची पडझड,घरांचे पत्रे उडने,यांचा समावेश आहे.४८ तासात मुसळधार पावसाची शक्यतायेत्या ४८ तासात जिल्'ात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.