लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : मालवण तालुक्याला सलग चार दिवस पावसाने झोडपून काढले आहे. ऐन गणेशोत्सवात कोसळलेल्या पावसाने साºयांचीच दाणादाण उडवली. शहरातील भरड येथील गजानन शंकर सारंग यांच्या घराची भिंत कोसळून तीन खोल्या जमीनदोस्त झाल्या. विशेष म्हणजे घरात गणपतीची प्रतिष्ठापना ज्या खोलीत केली आहे तेथील भिंत न पडल्याने बाप्पांसह कुटुंब सुखरूप असल्याचे सारंग कुटुंबीयांनी सांगितले. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली.मुंबईतील सारंग यांचे सहकुटुंब पाच दिवसांच्या गणेशोत्सवासाठी मालवण येथे आले आहे. चार दिवसांपासून पाऊस धो-धो कोसळत आहे. कोसळणाºया पावसामुळे घराच्या कडेने साचलेल्या पाण्यामुळे घराची भिंत आणि छप्पर पडले. यात तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. विशेष म्हणजे गणपती जेथे बसविण्यात आला आहे तेथील छप्पर सोडून अन्य तीन खोल्यांच्या भिंती व छप्पर कोसळले.यात घरागुती वापरातील वस्तुंचे नुकसान झाले. एकूण नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेना उपशहरप्रमुख गणेश कुडाळकर, महेश हडकर यांनी धाव घेतली. कामगारांना बोलावून कोसळलेल्या भिंती बाजूला करण्यास सुरुवात केली. तसेच तात्पुरत्या स्वरूपात घरावर ताडपत्री घालण्यात आली. घरातील सदस्य व नगरसेवक यतीन खोत यांनी घटनेची माहिती महसूल प्रशासनाला दिली. मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर यांनी घटनेचा पंचनामा केला.सुदैवाने विघ्न टळलेपावसाच्या पाण्याने सारंग यांच्या घराला वेढल्याने भिंत खचली. कुटुंब झोपेत असतानाच तीन खोल्या बघता बघता जमीनदोस्त झाल्या.मात्र घरात जेथे गणेशाची प्रतिष्ठापना केली होती तेथेच अजय गजानन सारंग, अर्चना अजित सारंग, अनुजा अजय सारंग, अमित अजित सारंग, आदित्य अजय सारंग हे झोपले होते. तेथील छप्पर व भिंत न पडल्याने सुदैवाने विघ्न टळले.
पावसाने घराच्या तीन खोल्या जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:00 PM