शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी घाबरले - परशुराम उपरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 5:05 PM

ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे.

कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत. मात्र, मराठी माणूस आणि हिंदुत्वासासाठी मनसेची स्थापना करण्यात आली होती. शिवसेनेसारख्या एका हिंदुत्ववादी पक्षाने बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाची कास सोडली. मात्र, राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या औचित्यावर अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे बाकीचे राजकीय पक्ष देवळात जाऊन आपल्या हिंदुत्वाचे दर्शन घडवत आहेत. ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे.मात्र हिंदूंना सवलत नाहीबाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. बाळासाहेबांचे शरद पवारांशी सलोख्याचे संबंध असले तरी त्यांना बाळासाहेबांनी अनेकदा सुनावले होते. इटलीहून लग्न करून भारतात आलेल्या सोनिया गांधींना पांढऱ्या पायाची म्हणणारे बाळासाहेबच होते. आज एकत्रित सत्तेत आल्यामुळे सरकार सेक्युलर झाले आहे. अल्पसंख्यांक मंत्र्यांनी मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी तीन हजार रुपये मासिक मानधन घोषित केले. मात्र इतर धर्मीय मुले गरीब असूनही त्यांना मानधन दिले जात नाही. हज यात्रेला विमान प्रवासासाठी सवलत दिली जाते. मात्र सर्व हिंदूंना पंढरपूरला जाण्यासाठी एसटीची किंवा इतर प्रवासाची सवलत सरकारने दिली नाही.विनायक राऊतांनी बाळासाहेबांची भाषणे ऐकावीतत्यामुळे एका हिंदुत्ववादी पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून ठरला होता त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे. राज ठाकरे हे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकावीत किंवा आम्ही ती त्यांना देतो. त्यावेळी बाळासाहेबांनीही दसरा मेळाव्यात भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती.

तत्कालीन नेते सरपोतदार यांनी भोंग्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. बाळासाहेबांनी रस्त्यावर पढल्या जाणाऱ्या नमाजाविरोधात उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांना आदेश दिले होते की त्यांनी महाआरती सुरू करावी. याबाबत खासदार राऊत अनभिज्ञ आहेत का? आज प्रखर हिंदुत्ववादी विचार बोलणारा जहाल नेता म्हणून राज ठाकरे लोकांना हवे आहेत. त्यामुळे बाकीच्या पक्षांच्या लोकांना पोटशूळ उठले आहेत.हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरजआता हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरज आहे. आपले परखड विचार मांडताना बाळासाहेबांनी जात्यांध मुसलमानांचा योग्य समाचार घेतला होता. त्याचप्रमाणे कोणत्याही कारवाईची पर्वा न करता राज ठाकरेही हिंदूत्वासाठी झटत आहेत. आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या बांडगुळांनी बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. तसेच राज ठाकरेंच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्यात जिल्ह्यातील शेकडो मनसैनिक सहभागी होणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Raj Thackerayराज ठाकरे