शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राजन तेली म्हणजे विषारी साप

By admin | Published: June 03, 2016 12:37 AM

दत्ता सामंत : नारायण राणे यांनीच विष पचवले

सावंतवाडी : ज्याप्रमाणे शंकराच्या गळ्यात विषारी साप आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्या बाजूला राजन तेलींसारखा विषारी साप बसत असे. यामुळे राणेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचे धाडस कुणाचेच होत नसे. मात्र आता तेलींसारखा विषारी सर्प भाजपमध्ये गेल्यानेच काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी जोरदार टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी तेलींवर पत्रकार परिषदेतून केली. काँगे्रस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद सामंत बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले की, राजन तेली यांच्या टिकेला गांभिर्याने घेण्याची गरज नाही. ते काँग्रेसमध्ये कशाप्रकारे होते ते आम्ही जवळून पाहिलेले आहे. मात्र ते विषारी सापाप्रमाणे असल्याने आम्ही नारायण राणेंपर्यत पोहोचू शकत नव्हतो. तेली यांची कदाचित स्मृतीभ्रंश झालेली असेल, आमची नाही. राजन तेलींचं विष पचविण्याची ताकद फक्त नारायण राणेंमध्येच होती, भाजपमध्ये नाही, असेही सामंत यांनी सांगितले. तेली यांचा जन्मच भाजपमध्ये दीड वर्षाचा आहे. मात्र ते आपले अस्तित्व राखण्यासाठी सत्तेला दोन वर्ष झालेल्याचा पाढा वाचत आहेत. त्यांनी विसरू नये की पहिल्या सहा महिन्यातही भाजपविरोधी केलेली जोरदार टीका यामुळे भाजपच्या भुलथापा त्यांनी जनतेसमोर मांडू नयेत. राजन तेली जातील तिथे दोन गट पडतात. स्थानिक पातळीवर भाजपमध्ये दोन गट पाडण्याचे काम तेलींचे सुरू आहे. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निवडीसाठी पक्ष श्रेष्ठीपर्यंत जावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे, असेही सामंत म्हणाले. (वार्ताहर)...तर केसरकरांचा सत्कार करूसिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले की, सर्व पर्यटक सिंधुदुर्गात उतरणार होते. गोव्याची काळजी करू पाहत असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुद्दाम धावपट्टी ३४०० मीटरवरून २४०० आणली. त्यामुळे चिपी विमानतळाचा वापर फक्त लॅन्डीगसाठी करण्याचा केसरकरांचा डाव आहे. चिपी विमानतळावर २०१७ साली विमान उतरविण्याची वल्गना करणारे केसरकर यांनी खरोखरच २०१७ साली विमान उतरवले तर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण स्वत: केसरकर यांचा सत्कार करू.- दत्ता सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष