सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आली असली तरी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता. त्यामुळे तेली यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा दिला होता. या राजीनामानाटया नंतर त्यांनी गोवा येथे जाऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. या गुप्त भेटी नंतर मंगळवारी तेली यांचा राजीनामा प्रदेश भाजपने नामंजूर केला आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेली यांना पाठवले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव करत एक हाती सत्ता खेचून आणली होती. मात्र या सत्ता नाट्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा मात्र धक्कादायक पराभव झाला होता. या पराभवानंतर तेली यांनी थेट आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अज्ञातवासात गेले होते. पण नंतर त्यांनी दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोवा येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती.यावेळी फडणवीस यांनी तेली यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी तेली यानी आपली कैफियत ही फडणवीस याच्या समोर माडली होती. त्यावर लवकरच मार्ग काढू असे आश्वासन तेली यांना दिले होते. त्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेली यांचा राजीनामा नामंजूर करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच पत्र ही तेली यांना पाठवून देण्यात आले आहे.
राजन तेलींचा राजीनामा प्रदेश भाजपकडून नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 5:30 PM