कुडाळ : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत पिंगुळी येथील रामू गौतम (४०) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास मधली कुंभारवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर घडली.बुधवारी दुपारी मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत रामू गौतम या तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वेची धडक बसल्यामुळे रामू हा रेल्वे रुळाच्या कडेला असलेल्या गटारात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी कुडाळ पोलीस ठाण्यात कळविले. तसेच कुंभारवाडी येथील काही ग्रामस्थांनीही कुडाळ पोलीस ठाण्याला या दुर्घटनेची माहिती दिली.कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र्र हुलावळे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक मोबाईल तुटलेल्या अवस्थेत दिसून आला.पोलिसांनी हा मोबाईल जोडला व सुरू केला असता काही क्षणातच त्यावर मृत गौतम याच्या पत्नीचा फोन आला. त्यामुळे मृत व्यक्ती ही रामू गौतम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.रेल्वेची धडक बसल्यानंतर रामू हा गटारात पडला होता. त्या गटारात मोठ्या प्रमाणात पाणी होते. तरीही कुडाळचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र्र हुलावळे व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र्र हुळावले, हवालदार पंढरीनाथ भांगरे, योगेश मांजरेकर, होमगार्ड विनोद सावंत व रुग्णवाहिका चालक राजू पाटकर यांनी मोठ्या प्रयत्नाने मृतदेह वर काढला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला.
राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 7:24 PM
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत पिंगुळी येथील रामू गौतम (४०) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास मधली कुंभारवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर घडली.
ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत तरुण ठारकुडाळ पोलीस ठाण्यात दुर्घटनेची माहिती