मालवण : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय विभागातील राज्यातील २४ सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची पदोन्नतीपर बढती केली आहे. यात सिंधुदुर्ग-मालवणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी श्रीकांत वारुंजीकर यांची सातारा येथे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारीपदी बढतीपर बदली झाली आहे.त्यांच्या जागी रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी राजकुमार महाडिक यांना बढतीपर बदली देण्यात आली आहे.पदुम विभागाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या आदेशाने या पदोन्नती बढत्या झाल्या. पदोन्नतीचे नियुक्तीपत्र प्राप्त झाल्यापासून तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील आठवड्यापर्यंत सर्व अधिकारी पदभार स्वीकारतील, अशी शक्यता आहे.मत्स्य व्यवसाय विभागाच्या कोकण १, कोकण २, पुणे, नाशिक, सातारा, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर या आठ विभागातील २४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांना खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यासाठी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचना प्रादेशिक उपआयुक्तांना देण्यात आल्या आहेत.सिंधुदुर्गच्या मालवण येथील मत्स्यव्यवसाय विकास कार्यालयात श्रीकांत वारुंजीकर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदावर १४ फेब्रुवारीपासून सेवा बजावत होते. प्रभारी मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या विरोधात मच्छीमारांच्या वाढत्या तक्रारी आणि मत्स्य कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट घातल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांची उचलबांगडी करीत पदभार काढून घेतला होता.त्यानंतर त्यांच्या जागी वारुंजीकर यांनी मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्याचा पदभार सांभाळला. वारुंजीकर यांनी मच्छिमार व मत्स्यव्यवसाय खात्यामध्ये समन्वय राखून काम केले. आता त्यांची बढतीपर बदली पुणे विभागातील सातारा मत्स्य व्यवासाय येथे झाली आहे.रत्नागिरीच्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात परवाना अधिकारी काम पाहणाºया आनंद पालव यांची पदोन्नती त्याचठिकाणी झाली असून ते आता मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.महाडिक लवकरच पदभार स्वीकारणारमालवण येथे असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास कार्यालयातील मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक हे पदभार स्वीकारणार आहेत. महाडिक यांनी रत्नागिरी जिल्ह्यात काम केल्याने त्यांना कोकणातील मच्छिमारांच्या संघर्षाबाबत परिपूर्ण माहिती असणार आहे.
१ आॅगस्टपासूनच्या नव्या मत्स्य हंगामापासून शासनाने अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जर अनधिकृत मासेमारी रोखली न गेल्यास त्यांना मच्छिमारांच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे.