शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

वारकरी संप्रदायाचे एसटी प्रशासनाच्या विरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित :राजू राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 5:31 PM

कणकवली: सिंधुदुर्गातुन पंढरपूर येथे माघी वारीतून जाणाऱ्यांमध्ये अनेक जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात .जेष्ठ नागरिकांना ५०% आरक्षण असताना जिल्ह्यातील एसटीच्या ...

ठळक मुद्देवारकरी संप्रदायाचे एसटी प्रशासनाच्या विरोधातील आंदोलन तूर्तास स्थगितराजू राणे यांची माहिती

कणकवली: सिंधुदुर्गातुन पंढरपूर येथे माघी वारीतून जाणाऱ्यांमध्ये अनेक जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात .जेष्ठ नागरिकांना ५०% आरक्षण असताना जिल्ह्यातील एसटीच्या अधिकाऱ्यांनी एका गाडीमध्ये फक्त ११ जेष्ठ नागरिकाना (वारकरी) यावर्षी आरक्षण देणार व ३० फुल सीटचे आरक्षण केलात तर गाडी बुकिंग करू असे जाहीर केले होते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करीत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राजू राणे यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी माघी वारीतून जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात. त्यांना सवलत नाकारल्याने १फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचे वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर केले होते. या आंदोलनाला सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनी वरून पाठिंबा दिला होता.त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. तसेच एस टी. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांनी आम्हाला चर्चेला बोलविले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेअंती प्रत्येक बुकींग होणाऱ्या गाडीमध्ये २४ फुल व २० जेष्ठ नागरिक असे बुकिंग दिले जाईल. तसेच एखाद्या ठिकाणी एक,दोन जादा जेष्ठ वारकरी असतील तर संबधित आगार व्यवस्थापकांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे ठरले.वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच वारकऱ्यांना बुकींग करतेवेळी काही अडचण आल्यास संबंधितांनी जिल्हा वाहतूक शाखेशी संपर्क साधावा.असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत चर्चेच्या वेळी सर्व आगार व्यवस्थापक यांना मोबाईल वरुन व्हाईस मेसेज करून ,तत्काळ आदेश देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ , वाहतूक शाखेचे अभिजित पाटील,सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे सचिव राजू राणे, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड तसेच एसटीचे सर्व अधिकारी व वारकरी उपस्थित होते. याबाबत खासदार विनायक राऊत यांनीही फोन करून विभाग नियंत्रक यांच्या बरोबर यावेळी चर्चा केली.त्यामुळे अगोदर जाहीर केलेले १ फेब्रुवारी रोजीचे वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला व संबंधित अधिकारी यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने आम्ही आभार मानत आहोत.असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग