शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

मृत भावाला केले रक्षाबंधन

By admin | Published: August 28, 2015 11:54 PM

परिसरात हळहळ : एडगाव येथील हृदयद्रावक घटना

वैभववाडी : हाडाच्या कॅन्सरने ग्रासलेल्या एडगाव इनामदारवाडी येथील हर्षद रवींद्र रावराणे (वय १६) या दहावीतील विद्यार्थ्याने गेले दीड वर्ष मृत्यूशी दिलेली झुंज व्यर्थ ठरली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हर्षदने जगाचा निरोप घेतला. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने त्याच्या पाचवीमध्ये शिकणाऱ्या लहान बहिणीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. साक्षीने मृत भावाच्या मनगटावर राखी बांधून दादा एक दिवस थांबला असतास तर... असा टाहो फोडत आक्रोश केला. साक्षीच्या आक्रोशाने हर्षदच्या अंत्यविधीला जमलेल्यांचे हृदय पिळवटून गेले.हर्षद कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात दहावीमध्ये शिकत होता. गेल्या दीड वर्षापूर्वी कॅन्सरमुळे तो आजारी पडला होता. त्याला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न होताच उपचार सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हर्षदच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली होती. त्याच्या कुटुंबाची अर्थिक स्थितीही बेताची आहे. यंदा शाळा सुरु झाल्यावर तो काही दिवस नियमित शाळेतही जात होता. मात्र, गेले काही दिवस त्याची तब्येत पुन्हा खालावली होती. त्यामुळे त्याला गुरुवारी उपचारासाठी कोल्हापूरला नेले होते. हर्षदची प्रकृती एकदमच खालावल्याने त्याला गुरुवारी रात्री घरी आणले होते.दीड वर्ष धीराने मृत्यूशी लढलेल्या हर्षदने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जगाचा निरोप घेत जन्मदात्या आई वडिलांना दुखा:च्या खाईत लोटले. सूर्योदयापूर्वीच हर्षदच्या मृत्यूची बातमी गावात कळली. तसे गाव सुन्न झाले. बहुतेक गावकऱ्यांनी त्याच्या आई वडिलांना धीर देण्यासाठी हर्षदच्या घरी धाव घेतली. हर्षदच्या मृत्यूची माहिती समजताच तालुक्यात लोक हळहळले. पंचक्रोशीतील अनेकांनी हर्षदचे घर गाठले.शनिवारी रक्षाबंधन असल्याने हर्षदसाठी साक्षीने राखी आणून ठेवली होती. मात्र, बहिण भावाच्या नात्याला धाग्यात गुंफून भाऊरायाला ओवाळणीसाठी आतुरलेल्या साक्षीला रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी भावाचा मृत्यू झाल्याने जबरदस्त धक्का बसला. साक्षीने मृत हर्षदच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाचाचे कर्तव्य पार पाडत भावाच्या मृतदेहाला कवटाळून आक्रोश केला. त्यावेळी उपस्थितांना गहिवरून येवून साऱ्यांचे डोळे पाणावले. हर्षदच्या मृत्यूमुळे माधवराव पवार विद्यालयाला सुट्टी देऊन शाळा व्यवस्थापनाने दुखवटा पाळला. तसेच त्याच्या वर्गातील मित्र मैत्रीणींसह शिक्षकांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांचे सांत्वन केले. हर्षदच्या पश्चात आई, वडील लहान बहिण, चुलते आणि आजी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)