शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वैभववाडी नगराध्यक्षपदी रावराणे

By admin | Published: November 24, 2015 11:48 PM

अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचा झेंडा : उपनगराध्यक्षपदी संजय चव्हाण

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे रवींद्र्र रावराणे विराजमान झाले. त्यांनी शिवसेनेचे रोहन रावराणे यांचा एका मताने पराभव केला. तर भाजपच्या सुचित्रा कदम यांना पराभूत करत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चव्हाण उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. दोन्ही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्याने काँग्रेसने शहरात फटाक्यांची आतषबाजी केली. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून रवींद्र रावराणे यांच्या विरोधात शिवसेनेचे रोहन रावराणे उमेदवार असल्याने निवडीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना स्वतंत्र आणि एकत्र बसवावे अशी लेखी विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली होती. तहसीलदार कार्यालयात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत काँग्रेसचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे काही मोजकेच पदाधिकारी येरझाऱ्या घालताना दिसत होते. (प्रतिनिधी)युतीचा चमत्काराचा दावा ठरला फोलदुपारी बारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी सर्व नगरसेवकांची सभा घेतली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. आर. गावीत उपस्थित होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेतले. नगराध्यक्षपदासाठी रवींद्र्र रावराणे यांना ९ व रोहन रावराणे यांना ८ तर उपनगराध्यक्षपदासाठी संजय चव्हाण ९ व सुचित्रा कदम यांना ८ मते मिळाली. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार एका मताने अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. यामुळे महायुतीचा चमत्कारांचा दावा फोल ठरला. (अधिक वृत्त हॅलो १)