शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कणकवलीत राणेंच्या ‘स्वाभिमान’चा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:05 AM

कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीने थेट नगराध्यक्ष व १७ पैकी ११ जागा जिंकून स्वाभिमानचा झेंडा नगरपंचायतीवर फडकविला आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी एकहाती विजय मिळवून विरोधकांना धूळ ...

कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीने थेट नगराध्यक्ष व १७ पैकी ११ जागा जिंकून स्वाभिमानचा झेंडा नगरपंचायतीवर फडकविला आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी एकहाती विजय मिळवून विरोधकांना धूळ चारली आहे.‘स्वाभिमान’च्या समीर नलावडे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या संदेश पारकर यांचा अतिशय अटीतटीच्या लढाईत अवघ्या ३७ मतांनी पराभव करीत यश प्राप्त केले. शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी तीन जागांवर समाधान मानावे लागले. स्वतंत्रपणे लढणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस व कणकवली विकास आघाडीला या निवडणुकीत आपले खाते खोलता आलेले नाही. मात्र, स्वाभिमानशी आघाडी केल्याने राष्ट्रवादीला अबिद नाईक यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. पक्ष स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक लढविणाºया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने युती केली होती. त्यातच नारायण राणे व त्यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे यांच्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.नगरपंचायतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्राबल्य!कणकवली नगरपंचायत निवडणूक निकालानंतर नगरपंचायतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच प्राबल्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या भाजपला तीन, शिवसेनेला तीन, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला नगरसेवक पदाच्या १० जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसने १ जागा मिळविली आहे, तर काँग्रेस व कणकवली विकास आघाडीला एकही जागा मिळविता आलेली नाही.जनतेचा कौल मान्य : संदेश पारकरकणकवली नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढाई झाली. आमचे उमेदवार अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले. जनतेचा कौल आपल्याला मान्य आहे. येत्या पाच वर्षांत आणखीन काम करून पुढील निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी यावेळी दिली.समीर नलावडे नगराध्यक्ष!कणकवली नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) विजयी झाले आहेत. त्यांना ४०९४ मते मिळाली आहेत. संदेश पारकर (भाजप) यांना ४०५७ मते, राकेश राणे (कणकवली विकास आघाडी) यांना ११४९ मते, विलास कोरगावकर (काँग्रेस) यांना २८० मते मिळाली आहेत, तर ७८ जणांनी नोटाचा वापर केला आहे.