लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताना सेना औषधाला ठेवणार नाही आणि आता काँग्रेसमधून दुसºया पक्षात जाताना काँग्रेस संपविण्याची भाषा राणे आणि त्यांची टोळी करत आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्व महत्वाची मंत्रीपदे दिल्यानंतरही ते समाधानी नाहीत. त्यामुळेच त्यांची मुख्यमंत्री ते ग्रामपंचायतीच्या दिशेने अधोगती सुरु झाली आहे, अशी जहरी टीका आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली.
मालवण शिवसेना शाखा कार्यालयात मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, किरण वाळके आदी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, सन२००५ मध्ये शिवसेना सोडताना नारायण राणे यांनी शिवसेना औषधाला शिल्लक ठेवणार नाही असे वक्तव्य केले होते. आता जिल्'ातील सत्ता काँग्रेसच्या हाती ठेवणार नाही असे राणे बोलत आहेत. सर्व पदे उपभोगूनही बारा वर्षांच्या कालावधीनंतरही राणेंची आसुरी भूमिका कायम आहे. त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाने राणेंची ही भूमिका लक्षात ठेवावी.ग्रामपंचायतीत अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडमुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघून नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते. आता काँग्रेसवर टीका करणारे राणे जिल्'ातील ग्रामपंचायतीमध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. यावरूनच त्यांची अधोगती झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून निलंबन होत असताना अशोक चव्हाण यांनीच राणे यांना काँग्रेसमध्ये घेतले होते, याचीही आठवण नाईक यांनी करून दिली.निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहणार !विकास सावंत हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्यावर राणेंच्या मुलांनी टीका करणे शोभत नाही. राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि समर्थकांची टोळी आता रत्नागिरीतही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे निलेश राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्याचे दिलेले आव्हान कधीच पूर्ण होणार नसून निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहील असा टोला हाणताना राणेंनी प्रथम कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असेही आव्हान नाईक यांनी दिले.