रत्नागिरी : शासनाच्या रेशनकार्ड संगणकीकरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याचे काम द्रुतगतीने झाले असून, आत्तापर्यंत ८,२१,९७६ लाभार्थ्यांचे ‘लिंकिंग’ करण्यात आले आहे. मात्र, शासनाने वंचित ठेवलेल्या एपीएलधारक आणि श्वेतकार्डधारकांकडून या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.शासनाच्या रेशनकार्ड संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याच्या कामाला जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेत, यासाठी रेशन दुकानांमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले होते. सुरूवातीला बहुतांशी नागरिकांची आधारकार्डच नसल्याने या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून यासाठी ठराविक मुदत देण्यात आल्यानंतर आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. आधारकार्ड काढण्यासाठी ठराविक ठिकाणीच मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत होती.आधारकार्डसाठीही विशेष मोहीम राबविण्यात आल्याने बहुतांशी नागरिकांची आधारनोंदणी झाली आहे. त्यापैकी ज्यांना आधार क्रमांक (युआयडी) मिळाले आहेत, त्यांच्याकडून ही माहिती भरून घेण्यात आली असून, या माहितीचे संगणकीकरणही झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३,७४,३९७ शिधापत्रिकाधारक असून, एकूण लाभार्थी संख्या १७,७०,४२४ इतकी आहे. या लाभार्थ्यांपैकी ८,२१,९७६ लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशनकार्डशी जोडण्यात आले आहे. तर ४१५५ शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक हा बँक खाते क्रमांकाशी संलग्न केला आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत येणाऱ्या प्राधान्य आणि अंत्योदय लाभार्थ्यांपैकी ७० टक्के लाभार्थ्यांचे संलग्नीकरण झाले आहे. मात्र, एपीएलधारक तसेच श्वेतकार्डधारक यांना शासनाकडून धान्याचा लाभ होत नसल्याने त्यांच्याकडून या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)नागरिकांची धावपळ : रेशनकार्डसाठी सक्तीचेराज्यात आधारकार्डची सक्ती केल्यानंतर आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, त्यानंतर अशी सक्ती करण्यात येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर आधारकार्ड काढण्याची मोहीम थंडावली होती. त्याचवेळी रेशनकार्डचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर रेशनकार्डसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले. शिधापत्रिकाधारक सदस्य (तालुकानिहाय) तालुकासदस्यसंलग्न संख्याचिपळूण२,८८,६४९१,२९,२३६दापोली२,०१,७१२८१,८०२गुहागर१,३३,७३०६१,९५६खेड१,९०,६००७४,०८३लांजा१,१६,५४६६९,०११तालुकासदस्यसंलग्न संख्यामंडणगड७४,९९०२१,९२७राजापूर२,०४,३७७९०,६०३रत्नागिरी३,३२,०४९१,६३,०१४संगमेश्वर२,२७,७७११,३०,३४४रेशनकार्डसाठी संगणकीकरणाचा महत्वांकाक्षी प्रकल्प.रेशन दुकानामध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते.आधारकार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
शिधापत्रिकाधारकांना ‘आधार’
By admin | Published: January 18, 2016 11:57 PM