शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

राज्यातील वनक्षेत्रात रत्नागिरी जिल्हा दुसरा

By admin | Published: September 09, 2016 11:35 PM

५२ टक्के वनक्षेत्र : खेड तालुक्यातील २ हजार ५९४ हेक्टर क्षेत्र जंगली; गुहागर, संगमेश्वरात कमी

सुभाष कदम -- चिपळूण --रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र असून, राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. राज्यात गडचिरोलीचा पहिला तर रत्नागिरी जिल्ह््याचा जंगलाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.जंगले वाढावी, त्यांचे संवर्धन व्हावे, जंगलातील लहानलहान जीव सुखाने नांदावेत, जंगलातील पेटंट कायम राहून त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र असून, खेड तालुक्यात २५९४ हेक्टर तर संगमेश्वर तालुक्यामध्ये २६७ हेक्टर वनक्षेत्र आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र हे खेड तालुक्यात तर सर्वात कमी वनक्षेत्र हे संगमेश्वर तालुक्यात आहे. संगमेश्वरमधील वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून, दरवर्षी येथे लाखो नवीन झाडे लावली जातात. शासनस्तरावर जंगले वाचविण्यासाठी वन संवर्धन अधिनियम १९८० तयार करण्यात आला असून, या अंतर्गत जंगल कसे असावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत. तर वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षतोडीस परवानगी देणे व दंड आकारणे, आदी गोष्टी येतात. या अधिनियमात १९८९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७नुसार तोडलेल्या मालाच्या वाहतुकीला परवानगी देता येते. तर १९६६चा जमीन महसूल अधिनियम महसूल विभागाकडे येतो. बिगर मनाई झाडांची तोड झाल्यास या अधिनियमाद्वारे कारवाई केली जाते. जैविक विविधता संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये कायदा केला आहे. या अधिनियमानुसार जंगल संवर्धनाचा हक्क स्थानिकांना मिळतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद आता ग्रामस्तरावर ठेवली जाणार आहे. कोकणात वनातील वणव्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी जंगलांना आगी लावल्या जातात. त्यामुळे आंबा, काजू बागांबरोबरच विविध औषधी व दुर्मीळ जातीच्या वनस्पती या आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. सरपटणारे प्राणी, लहान कीड, मुंग्या व लहान प्राणी यामध्ये जळून खाक होतात. यामुळे जैविक विविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. यासाठी शासनाकडून वणवामुक्त गाव अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्थांनी यासाठी शासनाला सहकार्य करावे. तसेच वन संवर्धन ही काळाची गरज असून, त्यासाठी आता जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.- विकास जगताप, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण)रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड २५९४, लांजा १२७५, दापोली ९६२, चिपळूण ६०५, रत्नागिरी ३३४, मंडणगड ३०२, राजापूर ३००, गुहागर २९६ आणि संगमेश्वर २६७ हेक्टर क्षेत्र हे जंगलांनी वेढलेले आहे. सर्वात जास्त जंगल हे खेड व लांजा तालुक्यात तर सर्वात कमी जंगल हे गुहागर व संगमेश्वर तालुक्यात आहे. वनखात्यातर्फे त्याचे संवर्धन केले जाते. वन विभागाचे कर्मचारी या भागात सदैव कार्यरत असतात.